2022 मध्ये, एकीकडे जगभरातील काही अब्जाधीशांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली तर बहुतेकांच्या संपत्तीत घट झाली.
भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांनी मात्र मंदीच्या छायेतही चांगली कमाई केली.
गौतम अदानी यांनी या वर्षी प्रचंड कमाई करताना जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीचा बहुमान मिळविला होता. मात्र नंतर तो एक पायरी घसरला आणि ते सध्या जगातील तिसरे सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत.
ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या आकडेवारीनुसार या वर्षात गौतम अदानी यांनी त्यांच्या संपत्तीमध्ये $ 33.80 बिलियनची भर घातली आहे. त्यांच्या संपत्तीत 44.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
या वर्षी अदानी यांनी त्यांच्या निव्वळ संपत्तीमध्ये जितकी मालमत्ता जोडली आहे ती पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजच्या एकूण बाजार भांडवलापेक्षा जास्त आहे (सुमारे $30 अब्ज).
एक्सचेंजच्या दैनिक बाजार अहवालानुसार, 26 डिसेंबर 2022 पर्यंत, पाक शेअर मार्केट मार्केट कॅप 64,09,47,32,80,070 पाकिस्तानी रुपये किंवा सुमारे $28.41 अब्ज होते.