पुढारी ऑनलाईन डेस्क :  आधार कार्ड ही आज आपल्‍या जगण्‍यातील अविभाज्‍य भाग आहे. प्रत्‍येक नागरिकांची ओळख असणारे हे कार्ड आज सर्वसामान्‍यांच्‍या जगण्‍याचा आधार बनलं आहे. नुकतेच याच आधार कार्डमुळे लग्‍नाच्‍या बाहुल्‍यावर उभारलेल्‍या तरुणाची फसवणूक टळली. नेमके हे कसं घडलं हे जाणून घेवूया…

सध्या तरुणांचा विवाह जमणे ही एक मोठी सामाजिक समस्‍या होत असल्‍याचे चित्र आहे. बेरोजगारी आणि मुलीच्‍या वाढलेल्‍या अपेक्षा यामुळे लग्‍नाळू तरुणांच्‍या विवाह जुळण्‍यात अनेक अडचणी येतात. यातूनच फसवणुकीचे अनेक घटनाही उजेडात येतात. असाच एक प्रकार हरियाणा आधार कार्डमुळे उजेडला आला.  लग्न समारंभातील एका नातेवाईकाच्‍या सतर्कतेमुळे नवरीची पोलखोल झाली.

हरियाणाच्या तरुणाचा पंजाबमधील एका तरुणीशी विवाह ठरला. लग्नाची तारीखही ठरली. आरोपी ओम प्रकाश या व्यक्तीने हे लग्न ठरविण्यासाठी पुढाकार घेतला होता. लग्‍नघटीका समीप आली. यावेळी वराच्‍या नातेवाईकाने या मुलीला मी याआधी एका लग्‍नात वधू म्‍हणून पाहिले आहे, असे सांगितले. तसेच ती सांगत असलेले नावही वेगळे असल्‍याची माहिती दिली.

वराच्‍या नातेवाईकांनी वधूच्‍या नातेवाईकांकडे आधारकार्डची मागणी केली. यावर तिचे नाव वेगळे होते. तिने व तिच्‍या नातेवाईकांनी बोगस नाव सांगिलते  होते. आधार कार्डवरुन  तरुणीने व तिच्‍या नातेवाईकांनी केलेली फसवणूक उघडकीस आली. तसेच बोगस लग्‍न करणार्‍या टोळीचा पदार्फाश झाला आहे. याप्रकरणी सात जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : 

  • Krutika Tulaskar : शेवंता हनीमूनसाठी हिमाचल प्रदेशमध्‍ये… फोटो सोशल मीडियावर व्हायरल
  • Anil Kapoor B’day: ‘असली छोकरा हुआ जवा रे..’ म्हणत अर्जुन-सोनमकडून खास अंदाजात शुभेच्छा
  • Suniel Shetty : सुनील शेट्टी ठरला तारणहार