FIFA World Cup 2022: जगातील सर्वात सुंदर स्त्रीयांपैकी एक आहे मोरक्कोच्या फूटबॉलपटूची पत्नी, जगभरात तिच्या सौंदर्याची चर्चा

fifa-world-cup-2022:-जगातील-सर्वात-सुंदर-स्त्रीयांपैकी-एक-आहे-मोरक्कोच्या-फूटबॉलपटूची-पत्नी,-जगभरात-तिच्या-सौंदर्याची-चर्चा

बलाढ्य पोर्तुगालला पराभवाचा धक्का देत मोरक्कोची fifa world cup च्या सेमीफायनलमध्ये धडक, मोरक्कोच्या या खेळाडूबरोबरच त्याच्या पत्नीचीही होतेय सर्वाधिक चर्चात

Updated: Dec 12, 2022, 09:57 PM IST

FIFA World Cup 2022: कतारमध्ये (Quatar) सुरु असलेल्या फिफा वर्ल्ड कप 2022 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 14 तारखेपासन सेमीफायनलची (Semi Final) रंगत सुरु होणार असून यंदा कोणता संघ वर्ल्ड कपवर नाव कोरणार याची उत्सुकता लाखो फूटबॉल चाहत्यांना (Football Fans) लागली आहे. यंदा पहिल्यांदाच मोरक्कोने (Morocco) थेट सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. जागतिक फूटबॉल क्रमवारीत 22 व्या स्थानावर असलेल्या मोरक्कोने बलाढ्य पोर्तुगालचा (Portugal) पराभव करत सेमीफायनल गाठली. फिफा वर्ल्ड कपच्या (FIFA World Cup 2022) सेमीफायनलमध्ये दाखल होणारा मोरक्का हा पहिला आफ्रिकी संघ (African Team) आहे. याआधी आफ्रिकेतला एकही संघ क्वार्टर फायनलच्या (Quarter Final) पुढे गेलेला नाही. सेमीफायनलमध्ये मोरक्कोचा सामना गतविजेत्या फ्रान्सशी (Morocco vs France) होणार आहे. 

मोरक्कोचा डिफेंडर हकीमी चर्चेत
मोरक्कोच्या शानदार कामगिरीत डिफेंडर अशरफ हकीमीची (Achraf hakimi) भूमिका महत्त्वाची ठरली आहे. स्पेनविरुद्धच्या (Spain) प्री क्वार्टर सामन्यात हकीमीने पेनल्टी शूटआऊटमध्ये विजयी गोल मारला होता. विशेष म्हणजे हकीमीने त्या देशाविरुद्ध गोल केला होता, ज्या देशात त्याचा जन्म झाला आहे. अशरफ हकीमी आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबतही नेहमीच चर्चेत असतो. 

हकीमी पत्नी आहे सौंदर्याची खाण
24 वर्षीय अशरफ हकीमीचं लग्न हिबा अबूकशी (Hiba Abouk) झालं आहे. जगातील सर्वात सुंदर स्त्रीयांमध्ये हीबा अबूकचं नाव घेतलं जातं. हकीमी आणि हिबा यांची पहिली भेट 2018 मध्ये झाली होती. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी लग्न केलं. हीबा स्पॅनिश मॉडल (Spanish Model) आहे आणि विशेष म्हणजे ती अशरफ हकीमीपेक्षा तब्बल 12 वर्षांनी मोठी आहे. 2018 मध्ये जेव्हा दोघांची पहिली भेट झाली होती, तेव्हा अशरफ 20 वर्षांचा तर हीबा 32 वर्षांची होती.

हीबा अबूक प्रसिद्ध मॉडेल
वोग अरेबिया या प्रसिद्ध मॅगेझीनमध्ये हकीमी आणि हीबा जोडीला स्थान मिळालं होतं. हीबा सोशल मीडियावरही चांगलीच सक्रीय असते. इन्स्टाग्रामवर हीबाचे 1.3 मिलिअनहून अधिक फॉलोअर्स आहेत. आपल्या मॉडलिंगचे सुंदर फोटो ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. यावरुन काही वेळा तिच्यावर टीकाही झाली आहे. लेखिका तस्लीमा नसरीन यांनी हीबाच्या फोटोवर ट्विट केलं होतं. मोरक्कोचा स्टार फूटबॉलपटू अशरफ हकीमी याची पत्नी मुस्लीम असूनही तिने हिजाब किंवा बुरखा परिधान केलेला नाही, असं तस्लीमा नसरीन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. 

मेसी-नेयमारसोबत खेळतो हकीमी
प्रसिद्ध फूटबॉल खेळाडूंमध्ये अशरफ हकीमीचं नाव घेतलं जातं. 2021 हे वर्षा हकीमीसाठी सर्वात आठवणीतलं ठरलं. फ्रांसच्या पीएसजी क्लबने हकीमीबरोबर करार केला. या करारामुळे हकीमीच्या फुटबॉल कारकिर्दीला नवी दिशा मिळाली. त्याला एम्बाप्पे, लिओनेल मेस्सी आणि नेयमार यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळाली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *