FIFA WC 2022

पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषक स्पर्धेतील राऊंड ऑफ १६ फेरीत मंगळवारी मोठा उलटफेर पहायला मिळाला. मोरोक्को आणि स्पेन यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात मोरोक्कोने स्पेनचा पेनल्टीवर ३ – ० अशा गोलफरकाने पराभव केला. ऐतिहासीक कामगिरी बजावत मोरोक्कोने प्रथमच विश्वचषकातील उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची किमया केली. तर मोरोक्को समोर स्पेन अक्षरश: फुसका बार ठरली.

स्पेन आणि मोरोक्को यांच्यातील सामन्यात पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी आक्रमक खेळी करूनही गोल करण्यात दोन्ही संघास अपयश आले. सामन्यात मोरोक्कोने स्पेनच्या गोलपोस्टवर ६ शॉट मारले. त्यापैकी ३ शॉट टार्गेटवर होते. तर, स्पेनने १३ शॉट मोरोक्कोच्या गोलपोस्टवर मारले. त्यापैकी फक्त १ शॉट टार्गेटवर ठेवण्यात त्यांना यश आले.

सामन्याच्या सुरूवातीपासून दोन्ही संघांनी आक्रमक खेळीचा अवलंब केला. दोन्ही संघांनी गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. दोन्ही संघाच्या बचावपटूंनी केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे दोन्ही संघांना गोल करण्यात यश आले नाही. सामन्याच्या दोन्ही हाफमध्ये अनेक संधी निर्माण करूनही दोन्ही संघाना गोल करण्यात अपयशी ठरल्यामुळे सामन्यात रेफरींना अतिरिक्त वेळ (९०+३०) दिला. यावेळत ही सामन्याचा निकाल न लागल्यामुळे सामना पेनल्टीवर खेळवण्यात आला.

सामना अतिरिक्त वेळेत

स्पेन आणि मोरोक्कोच्या संघांना निर्धारित ९० मिनिटांत एकही गोल करता न आल्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत खेळवण्यात आला. अतिरिक्त वेळेत १५-१५ मिनिटांचे दोन हाफ खेळवले जातात. या ३० मिनिटात एकही गोल न झाल्यास सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटवर होते. या विश्वचषकात दुसऱ्यांदा सामना अतिरिक्त वेळेत खेळवण्यात येत आहे. याआधी सोमवारी क्रोएशियाने पेनल्टी शूटआऊटमध्ये जपानचा पराभव केला.

असा झाला पेनल्टी शूटआऊट

निर्धारित ९० मिनिटांत एकही गोल न झाल्याने सामना अतिरिक्त वेळेत गेला. अतिरिक्त वेळ संपल्यानंतर स्कोअर ०-० असा राहिला. त्यानंतर सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये झाला. मोरोक्कोसाठी पेनल्टी शूटआऊटमध्ये अब्देलहामिद साबिरी, हकीम झिएच आणि अश्रफ हकीमी यांनी गोल केला. तर, बेनूलचा पेनल्टी शूटआऊटमध्ये गोल हुकला. त्याचवेळी स्पेनकडून पाब्लो साराबिया, कार्लोस सोलर आणि सर्जिओ बुस्केट्स यांना गोल करण्यात यश आले नाही. अशा प्रकारे, मोरोक्कोने पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेनचा ३-० असा पराभव केला. या सामन्यात मोरोक्कोच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या संघाचा गोलकीपर यासिन बोनो याला संघातील इतर खेळाडूंनी खांद्यावर घेऊन आनंद व्यक्त केला.

That winning feeling 🤩 🇲🇦 #FIFAWorldCup | #Qatar2022 pic.twitter.com/SdCu2E9wmF

— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 6, 2022

हेही वाचा;

  • Supreme Court : कोणतीही व्यक्ती उपाशीपोटी झोपता कामा नये; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश
  • PAK vs ENG : पाकच्या पराभवामुळे भारताचा फायदा