FIFA 2022 Final Argentina vs France: मेस्सीच स्वप्न पूर्ण, अर्जेंटिना 36 वर्षानंतर पुुन्हा वर्ल्ड चॅम्पियन

fifa-2022-final-argentina-vs-france:-मेस्सीच-स्वप्न-पूर्ण,-अर्जेंटिना-36-वर्षानंतर-पुुन्हा-वर्ल्ड-चॅम्पियन

FIFA 2022 Final Argentina vs France: आज जगताली कोट्यवधील फुटबॉलप्रेमींच या फायनल मॅचकडे लक्ष लागलं होतं.

FIFA 2022 Final Argentina vs France: मेस्सीच स्वप्न पूर्ण, अर्जेंटिना 36 वर्षानंतर पुुन्हा वर्ल्ड चॅम्पियन

Argentina beat France in final

Image Credit source: instagram

FIFA World Cup 2022 Final : अर्जेंटिना आणि फ्रान्समध्ये रविवारी फिफा वर्ल्ड कप 2022 स्पर्धेची फायनल झाली. अपेक्षेप्रमाणे फायनलचा सामना रंगतदार झाला. निर्धारित 90 मिनिट आणि त्यानंतर एक्स्ट्रा टाइममध्ये प्रेक्षकांनी फुटबॉलचा सर्वोच्च थरार अनुभवला. दोन्ही टीम्स 3-3 अशा गोल बरोबरीत राहील्याने पेनल्टी शूटआऊटद्वारे निर्णय झाला. अर्जेंटिनाने पेन्लटी शूटआऊटमध्ये फ्रान्सवर 4-2 असा विजय मिळवला.

पहिल्या हाफमध्ये लियोनल मेस्सीच्या अर्जेंटिनाने 2-0 अशी आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या हाफमध्ये फ्रान्सने दोन गोल करुन बरोबरी साधली. अर्जेंटिना आणि फ्रान्स दोन्ही टीम्सनी प्रत्येकी 2-2 वेळा फुटबॉल वर्ल्ड कप जिंकला आहे. सेमीफायनलमध्ये अर्जेंटिनाने क्रोएशिया आणि फ्रान्सने मोरक्कोला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. लुसैल स्टेडियममध्ये हा सामना खेळला जात आहे.

कुठल्या मिनिटाला कोणी गोल केला, जाणून घ्या…

22 व्या मिनिटाला अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली. कारण डेम्बेलीने डिमारयाला बॉक्सच्या आत पाडलं. अर्जेंटिनाचा कॅप्टन लियोनल मेस्सीने मिळालेल्या संधीच सोनं केलं. त्याने गोल करण्यात कोणतीही चूक केली नाही. अर्जेंटिनाला 1-0 अशी आघाडी मिळाली.

अर्जेंटिनाने 36 व्या मिनिटाला दुसरा गोल केला. एंगेल डिमारियाने अर्जेंटिनाची आघाडी वाढवली. मेसीने मॅक एलिस्टरकडे पास दिला. त्याने लेफ्ट विंगकडून डिमारियाकडे चेंडू पास केला. त्याने कुठलीही चूक न करता दुसरा गोल केला.

79 व्या मिनिटाला फ्रान्सला पेनल्टी मिळाली. अर्जेंटिनाच्या ओट्टामेंडने बॉक्सच्या पाठीमागून फाऊल केला. रेफ्रीने सरळ पेनल्टी किक दिली.

फ्रान्सचा स्टार प्लेयर कीलियन एमबाप्पेने पहिली पेनल्टी घेतली. कुठलीही चूक न करता त्याने चेंडू गोल जाळ्यात धाडला. फ्रान्सचा पहिला गोल झाला.

दोनच मिनिटांनी 82 व्या मिनिटाला एमबाप्पेने दुसरा गोल केला. मॅच संपायला 8 मिनिट बाकी असताना फ्रान्सने दुसरा गोल केला. राइट विंगला किंग्सलेने मेस्सीकडून चेंडूचा ताबा घेतला. वेगाने पुढे जात लेफ्ट विंगला एमबाप्पेकडे पास दिला. त्याने फ्रान्ससाठी दुसरा मैदानी गोल केला. मार्टिनेज हा गोल रोखण्यात अपयशी ठरला.

90 मिनिट आणि अतिरिक्त इंजरी टाइममध्ये दोन्ही टीम्स 2-2 बरोबरीत राहिल्या. आता अतिरिक्त 30 मिनिट देण्यात आली आहेत.

108 व्या मिनिटाला अर्जेंटिनासाठी लियोनल मेस्सीने तिसरा गोल केला. राइट विंगवरुन अर्जेंटिनाचा अटॅक फ्रान्सच्या बॉक्समध्ये घुसला. गोलकीपर लॉरिसने हा चेंडू रोखला. पण मेस्सीने प्रचंड वेगात येऊन चेंडू गोल जाळ्यात धाडला.

सामन्यात 116 व्या मिनिटाला फ्रान्सला पेनल्टी किक मिळाली. एमबाप्पेने जोरदार शॉट मारला. अर्जेंटिनाच्या डिफेंडरच्या हाताला चेंडू लागला. एमबाप्पे पेनल्टीवर गोल करण्यात कुठलीही चूक केली नाही. त्याने फायनलमध्ये गोल हॅट्रीक केली.

वर्ल्ड कप फायनलमध्ये हॅट्रीक करणारा एमबाप्पे पेले यांच्यानंतर दुसरा खेळाडू बनला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *