Employment : देशात रोजगार वाढले, ऑक्टोबरच्या आकडेवारीने उत्साह भरला, ESIC मध्ये इतक्या लाख नवीन सदस्यांची नोंद

employment-:-देशात-रोजगार-वाढले,-ऑक्टोबरच्या-आकडेवारीने-उत्साह-भरला,-esic-मध्ये-इतक्या-लाख-नवीन-सदस्यांची-नोंद

Employment : देशात रोजगार वाढल्याचे आकडेवाडीवरुन समोर आले आहे.

Employment : देशात रोजगार वाढले, ऑक्टोबरच्या आकडेवारीने उत्साह भरला, ESIC मध्ये इतक्या लाख नवीन सदस्यांची नोंद

रोजगाराच्या आघाडीवर सुवार्ता

Image Credit source: सोशल मीडिया

नवी दिल्ली : देशात रोजगाराच्या (Employment ) आघाडीवर खूशखबर आली आहे. कर्मचारी राज्य विमा निगमच्या (ESIC) सदस्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या सामाजिक सुरक्षा योजनेतंर्गत ऑक्टोबर महिन्यात जवळपास 11.82 लाख नवीन सदस्यांची (New Members) नोंद झाली आहे. मोठ्या प्रमाणात नवीन सदस्य जोडल्या गेल्याचे केंद्र शासनाने सादर केलेल्या आकडेवारीवरुन सिद्ध झाले आहे. संघटीत क्षेत्रात, मोठ्या प्रमाणात रोजगार वाढल्याचे यावरुन स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) ही माहिती दिली.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने याविषयीचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारला ही मोठा दिलासा मिळाला आहे. ESIC मध्ये आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 1.49 कोटी सदस्य होते. तर आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये हा आकडा 1.15 कोटी होता. 2019-20 मध्ये ही संख्या 1.51 कोटी तर 2018-19 मध्ये ही संख्या 1.49 कोटी इतकी होती.

एनएसओ नवीन सदस्यांचा हा आकडा तीन संस्थांच्या आधारे जाहीर केला आहे. त्यामध्ये ESIC, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आणि पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी (PFRDA) यांचा समावेश आहे. या संघटनांच्या डेटा आधारे हा आकडा जाहीर करण्यात आला आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ऑक्टोबर महिन्यात 12.94 लाख नवीन सदस्य जोडले. कामगार मंत्रालयाने याविषयीचा खुलासा केला. त्यानुसार, भारतातील जवळपास 2,282 आस्थापनांनी पहिल्यांदाच नोंदणी केली आहे. भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतुदी कायदा, 1952 ची त्यांनी अंमलबजावणी सुरु केली आहे.

ऑक्टोबर,2022 मध्ये अंशधारकांच्या संख्येत वाढ झाली आहे. ईपीएफओच्या तात्पुरत्या वेतनश्रेणीच्या आकडेवारीनुसार, या महिन्यात एकूण 12.94 लाख सदस्य जोडल्या गेले. त्यापैकी 7.28 लाख नवीन सदस्य प्रथमच EPFO ​​चे सदस्य झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *