Elon Musk बनवणार स्मार्टफोन? 'त्या' उत्तराने Apple आणि Google ची झोप उडाली

elon-musk-बनवणार-स्मार्टफोन?-'त्या'-उत्तराने-apple-आणि-google-ची-झोप-उडाली

Elon Musk make his own smartphone: एलोन मस्क सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ट्विटरचा मालकी हक्क घेतल्यानंतर एलोन मस्क यांची सक्रियता वाढली आहे. आता त्यांच्या एका इशाऱ्यामुळे अ‍ॅपल आणि गुगलची झोप उडाली आहे. जर या दोन्ही कंपन्यांनी प्ले आणि अ‍ॅपल स्टोअरवर ट्विटर बॅन केलं, तर…

Updated: Nov 28, 2022, 05:22 PM IST

Elon Musk make his own smartphone: एलोन मस्क सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ट्विटरचा मालकी हक्क घेतल्यानंतर एलोन मस्क यांची सक्रियता वाढली आहे. आता त्यांच्या एका इशाऱ्यामुळे अ‍ॅपल आणि गुगलची झोप उडाली आहे. जर या दोन्ही कंपन्यांनी प्ले आणि अ‍ॅपल स्टोअरवर ट्विटर बॅन केलं, तर स्वत: स्मार्टफोन बनवणार असं सांगितलं आहे. कंटेंट मॉडरेशन इश्यूवर ट्विटर अ‍ॅपल आणि गुगल अ‍ॅप स्टोअरवर बॅन केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर एलोन मस्क यांनी हा इशारा दिला आहे. एका युजर्सने विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिलं आहे. 

युजर्सने विचारलेल्या प्रश्नाला असं दिलं उत्तर

एका ट्विटर युजर्सने विचारलं की, गुगल किंवा अ‍ॅपलने ट्विटरवर बंदी घातली तर एलोन मस्क बाजारात नवीन फोन लाँच करतील का? त्यावर एलोन मस्क यांनी सांगितलं की, ‘मला आशा आहे की असे होणार नाही. पण असं झालं तर फोन तयार करेन.’ यावर नथिंगचे संस्थापक कार्ल पेई यांनी प्रतिक्रिया दिली. मस्क पुढे काय करतात हे पाहण्यासाठी उत्सुक आहे, सांगितलं आहे.

I certainly hope it does not come to that, but, yes, if there is no other choice, I will make an alternative phone

— Elon Musk (@elonmusk) November 25, 2022

Apple आणि Google असं पाऊल उचलू शकतात का?

अ‍ॅपल आणि गुगल असं पाऊल उचलू शकतात का? तर याचं उत्तर ‘हो’ असं आहे. जर त्यांनी नियमांचं पालन केलं नाही तर अ‍ॅप स्टोअरवर बंदी आणली जाऊ शकते. एलोन मस्क ट्विटर सब्सक्रिप्शन प्लान लाँच करणार आहे. युजर्सकडून 8 डॉलर चार्ज करण्याची तयारी आहे. त्यामुळे ट्विटरचा रेवेन्यू वाढेल आणि त्याचा थेट फायदा अ‍ॅपल आणि गुगलला होईल. 

बातमी वाचा- Upcoming Cars: नवीन कार खरेदी करायच्या विचारात आहात! या पाच कार जानेवारीत होणार लाँच

अ‍ॅपल आणि गुगल त्यांच्या प्लॅटफॉर्मवर खरेदी केलेल्या सबस्क्रिप्शनवर कमिशन घेतात. दोघेही डेव्हलपर्सकडून 15 टक्के शुल्क घेतात. एलोन मस्क यांनी अ‍ॅपल आणि गुगल यांच्यावर नेहमीच टीका केली आहे. मस्कने अ‍ॅपल आणि गुगलच्या पेमेंट स्ट्रक्चरला बायपास केल्यास ट्विटरवर अ‍ॅप स्टोअरवरून बंदी घातली जाऊ शकते, असा दावा टेक अ‍ॅनालिस्ट मार्क गुरमन यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *