Earthquake Today: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, काबूलसह अनेक शहरांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

अफगाणिस्तानमध्ये आज भूकंप आला. हा भूकंप किती वाजता आला आणि किती तीव्रतेचा होता जाणून घ्या.
अफगाणिस्तान भूकंप
Image Credit source: Social Media
काबूल, अफगाणिस्तानात भूकंपाचे (Afghanistan Earthquake) जोरदार धक्के जाणवले. काबूलसह देशातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. स्थानिक वेळेनुसार सकाळी 6.20 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे लोकं घाबरले आणि रस्त्यावर आले. अफगाणिस्तानपासून 30 किमी अंतरावर असलेल्या पुल-ए आलममध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू 4.2 इतका होता. अलिकडच्या काळात या भागात भूकंपाच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या महिन्यातही एकापाठोपाठ एक भूकंप झाले. यामध्ये भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा समावेश होता.
दिल्लीत 29 नोव्हेंबरलाही भूकंप झाला होता, ज्याची तीव्रता 2.5 एवढी होती. सुदैवाने भारतात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. 12 नोव्हेंबर रोजी दिल्ली-एनसीआर, यूपी, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये पृथ्वी हादरली. त्यानंतर भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता, जिथे 6 लोकांचा मृत्यू झाला.
इंडोनेशियामध्ये झाला प्रचंड विध्वंस
तर इंडोनेशियामध्ये गेल्या महिन्यात भूकंपामुळे मोठी हानी झाली होती. तेथे सुमारे 300 लोक मारले गेले आणि हजारो जखमी झाले. 22 नोव्हेंबर रोजी पश्चिम जावा प्रांतात 5.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला.