Dr Anil Goyal

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीयांची रोगप्रतिकारक शक्ती चिनी नागरिकांपेक्षा उत्तम आहे; शिवाय भारतात जवळपास 95 टक्के लसीकरण झालेले असल्याने भारतात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्याची वेळ येणार नाही, असा दिलासा इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. अनिल गोयल दिला आहे. (Dr Anil Goyal)

एका मुलाखतीत डॉ. गोयल म्हणाले की, भारतात गुरुवारी 185 कोरोना रुग्ण आढळले. आदल्या दिवशीपेक्षा फक्त सहाच रुग्णांची वाढ झाली आहे. चीनमध्ये ज्या झपाट्याने कोरोनाचा प्रसार होत आहे, तशी स्थिती भारतात नाही. त्याला कारण म्हणजे भारतात जवळजवळ 95 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. शिवाय भारतीय नागरिकांची रोग प्रतिकारक शक्तीही चिनी नागरिकांपेक्षा अधिक चांगली आहे. त्यामुळे भारतात लॉकडाऊन जाहीर करण्याची वेळ येणार नाही. पण काळजी घेण्यासाठी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती, शारीरिक अंतर ठेवण्याची सक्ती आदी निर्बंध पाळावे लागू शकतात. (Dr Anil Goyal)

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी भारताने पुन्हा एकदा मूलभूत पद्धतच स्वीकारली पाहिजे. ती म्हणजे टेस्टिंग, ट्रेसिंग आणि उपचार ही त्रिसूत्री असल्याचे गोयल म्हणाले. (Dr Anil Goyal)

नाकावाटे देणार्‍या लसीची आजपासून नोंदणी 

नाकावाटे देण्यात येणार्‍या लसीची नोंदणी शनिवार (दि. 24) पासून करता येणार आहे. कोविन अ‍ॅपवर ही नोंदणी करता येईल. केंद्रीय आरोग्यमंंत्री मनसुख मांडवीय यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. केंद्र सरकारने भारत बायोटेकने विकसित केलेल्या नाकावाटे दिल्या जाणार्‍या लसीला परवानगी दिली आहे. खासगी रुग्णालयांत सध्या बूस्टर डोस म्हणून ही लस घेता येईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

#COVID19 | There won’t be a lockdown situation in the country since 95% of the people here are vaccinated. The immunity system of Indians is stronger than that of the Chinese…India needs to go back to COVID basics – testing, treating, tracing: Dr Anil Goyal, Indian Medical Assn pic.twitter.com/4VNiwJbBZ0

— ANI (@ANI) December 22, 2022

अधिक वाचा :

  • Charles Sobhraj Released : बिकीनी किलर चार्ल्स शोभराजची नेपाळच्या जेलमधून सुटका; फ्रान्सकडे केले सुपूर्द
  • Free Ration : गरिबांना पुढील वर्षभर मिळणार अन्नधान्य मोफत; ८१.३ कोटी लोकांना मिळणार लाभ
  • Chanda Kochhar Arrest : चंदा कोचर यांना त्यांच्या पतीसह सीबीआयने केली अटक