Disha Salian Case : 'त्या' बातम्या खोट्या : दिशा सालियन प्रकरणात CBI चा मोठा खुलासा

disha-salian-case-:-'त्या'-बातम्या-खोट्या-:-दिशा-सालियन-प्रकरणात-cbi-चा-मोठा-खुलासा

नवी दिल्ली : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयने मोठा खुलासा केला आहे. हे प्रकरण सीबीआयने कधीही हाताळलं नव्हतं. तसंच हे प्रकरण सीबीआयकडे कधीही सोपविण्यात नव्हतं, त्यामुळे यात कोणताही तपास केला नाही. या प्रकरणात ‘सीबीआयचा निष्कर्ष’ अशा फिरणाऱ्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. सीबीआयकडून याबाबत अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलं आहे. 

महाराष्ट्रात सध्या दिशा सालियन मृत्यू प्रकरण चर्चेत आलं आहे. काही दिवसांपूर्वी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत बोलताना सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार आरोप केले. तोच मुद्दा उचलून महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आमदारांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सभागृहात बराच गदारोळ घातला.

दिशा सालियान प्रकरणी भाजपचे आमदार अमित साटम यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली. साटम यांच्या मागणीला इतरही आमदारांनी पाठिंबा दिला. त्यामुळे दोनदा सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं होतं. अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य करत हे प्रकरण एसआयटीकडे देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार भारत गोगावले यांनीही दिशा सालियन प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. ते म्हणाले होते, “दिशा सालियने आत्महत्या केली की तिला फेकून दिलं या निष्कर्षांपर्यंत पोलीस पोहोचले नाहीत. दिशा सालियन ही सुशांतसिंह राजपूतचं काम पाहत होती. दोघांमधील मोबाईल संभाषण आणि चॅट्स उघड न होणे, सदर विषयात दिशा सालियनने सुशांतसिंग राजपूतला फोटो पाठवले होते, त्यानंतर दिशाचा संशयास्पद मृत्यू. त्यानंतर सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू झाला.”

“त्याच्या मृत्यूमध्ये सीबीआयने कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. त्यामुळे दोन्ही मृत्यूंमध्ये काही साम्य असल्याचं आम्हाला वाटतं. दिशा सालियनचा पोस्टमार्टेम रिपोर्ट उघड झालेला नाही. दिशा सालियनच्या मोबाईलमधील संभाषणाची चौकशी होणे आवश्यक आहे. दिल्लीपासून इथेपर्यंत हे प्रकरण गाजतं आहे. यात खुलासा व्हायला पाहिजे. फेर तपास होणं गरजेचं आहे,” अशी मागणी गोगावले यांनी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *