devotees-given-record-break-donations-at-shirdi

शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी कोटींचं दान प्राप्त झालं आहे. यंदा भक्तांनी भरभरुन साईचरणी दान दिलंय.

शिर्डी :  ख्रिसमसच्या सुट्ट्या‌ आणि नववर्षात साईबाबा संस्थानला कोट्यवधींच विक्रमी दान प्राप्त झालंय. २५ डिसेंबर ते २ जानेवारी या ९ दिवसात ८ लाख भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतले असून तब्बल १७ कोटी ८१ लाखांचं दान साईभक्तांनी बाबांच्या चरणी अर्पण केलंय. तर एक वर्षात तब्बल ४१८ कोटींहुन अधिक विक्रमी दान साई संस्थानच्या तिजोरीत जमा झालंय.

विविध सरूपात साईंच्या चरणी भक्तांनी दान केलंय.

दानपेटीत – ८ कोटी ७८ लाख ७९ हजार रुपये, देणगी काउंटरद्वारे – ३ कोटी ६७ लाख ६७ हजार ६९८ रुपये डेबीट / क्रेडीट कार्डद्वारे – २ कोटी १५ लाख १८ हजार रुपये ऑनलाइन देणगी – १ कोटी २१ लाख रुपये मनिऑर्डर द्वारे – ३२ लाख रुपये सोनं १ किलो ८४९ – ९० लाख ३१ हजार रुपये १६ किलो चांदी – ६ लाख ११ रुपये

साईबाबा संस्थानला ९ दिवसात विविध माध्यमातून जवळपास ७ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.

२५ डिसेंबर ते ०२ जानेवारी या ९ दिवसाच्या कालावधीत ५ लाख ७० हजार २८० भक्तांनी संस्थानच्या प्रसादलयात मोफत भोजनाचा लाभ घेतला. सशुल्क आरती तसेच दर्शनपास द्वारे संस्थानला ४ कोटी ०५ लाख, लाडू विक्रीद्वारे १ कोटी ३२ लाख तर निवास व्यवस्थेतून १ कोटी ४४ लाख अस एकूण ७ कोटी रुपयांचे उत्पन्न देखील संस्थानला प्राप्त झालंय, यादरम्यान १७१ रक्तदात्यांनी साई संस्थानच्या रक्तपेढीत रक्तदान करत आपली श्रद्धा साईचरणी अर्पण केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *