Cyclone Mandous: महाराष्ट्रावर पुन्हा अस्मानी संकट, अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता

cyclone-mandous:-महाराष्ट्रावर-पुन्हा-अस्मानी-संकट,-अनेक-जिल्ह्यात-अवकाळी-पावसाची-शक्यता

News

  • मुख्यपृष्ठ
  • बातम्या &nbsp/ महाराष्ट्र
  • Cyclone Mandous: महाराष्ट्रावर पुन्हा अस्मानी संकट, अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता

Cyclone Mandous: महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अस्मानी संकट घोंगावतेय. कारण बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे.

By: एबीपी माझा ब्युरो | Updated at : 08 Dec 2022 11:49 PM (IST)

Edited By: नामदेव कुंभार

Cyclone Mandous intensifies into severe cyclonic storm, may weaken before landfall near Chennai Cyclone Mandous: महाराष्ट्रावर पुन्हा अस्मानी संकट,  अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता

Cyclone Mandous

Cyclone Mandous: महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अस्मानी संकट घोंगावतेय. कारण बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हवामान विभागाने याला मंदोस चक्रीवादळ असे नाव दिलेय. या चक्रीवादळाचा फटका दक्षिणेकडील राज्यांना जास्त बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ तामिळाडूच्या किनारपट्टीला धडकणार असल्यामुळे 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या दरम्यान वाऱ्याचा वेग 65 किमी प्रतितास ते 85 किमी प्रतितास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्र आणि गुजरातलाही फटका बसण्याची शक्यता आहे. 
 
मुंबईत पावसाची शक्यता –
पुढील आठवड्याची सुरुवात मुंबईमध्ये हलक्या पावसाच्या हालचालींसह होण्याची शक्यता आहे. आयएमडीने आपल्या पाच दिवसांच्या जिल्ह्याच्या अंदाजात म्हटले आहे की 12 डिसेंबर रोजी मुंबईच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. याबाबत ठाण्याच्या तज्ञांनी सांगितले की, या पावसाचे कारण चक्रीवादळ आहे. 

महाराष्ट्रात कुठे कुठे पाऊस पडणार?
मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 12, 13, 14 आणि 15 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात, मध्ये प्रदेश आणि गुजरातच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. महाराष्ट्रात मुंबई ,पुणे ,ठाणे, रायगड  आणि गोव्याच्या किनाऱ्याजवळ वादळ पुन्हा आले आहे.  त्याचा प्रभाव पडल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणासह मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार असून तापमानातील वाढही कायम राहण्याची शक्यता आहे. 

Cyclonic Storm “Mandous” over SW Bay of Bengal:Cyclone Alert.🌀📢

Is 620km SE of Chennai.Very likly to mve WNW & cross N Tamil Nadu, Puducherry & adj South AP coast betn Puducherry & Sriharikota with max sustained winds 65-75 kmph gusting 85 kmph arnd mid night of 9 Dec.

News Reels

– IMD. pic.twitter.com/Tu43T0tvSy — K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 8, 2022

EOS-06 images Cyclone Mandous. This image combines the cloud structure provided by Ocean Colour Monitor (OCM) with wind vector data derived from the Scatterometer.

OCM also identified algae (coccolithophore) blooming off the coast of Argentina in the South Atlantic Ocean. pic.twitter.com/lexxGyEwDq

— ISRO (@isro) December 8, 2022

Severe Cyclonic Storm “Mandous”over SW BoB (Cyclone Warning for North TN,Puducherry & South AP coast): Orange Message.
SCS ~310km ESE of Karaikal & 390km SSE of Chennai.Very likly to maintain its intensity of SCS till early mrning of 9 Dec & then weaken into cyclonic storm.
1/2 pic.twitter.com/lG94mZKqoG

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 8, 2022

Tamil Nadu | Greater Chennai Corporation Commissioner had a discussion with officials regarding precautionary measures to be taken in view of Mandous Cyclone. GCC has given orders to close all parks and playgrounds till further announcement. pic.twitter.com/aPFRs1YEQm

— ANI (@ANI) December 8, 2022

आणखी वाचा:
आम्ही ते बांधकाम पाडण्याचे आदेश दिले नसते तर, न्यायालयानं आपल्याच एका निकालावर व्यक्त केली खंत

Published at : 08 Dec 2022 11:49 PM (IST) Tags: cyclone ‘Maharashtra Cyclone Mandous

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *