Cristiano Ronaldo: गिफ्ट असावं तर असं…लाखात एक, ख्रिसमसच्या मुहुर्तावर रोनाल्डोला गर्लफ्रेंडकडून खास गिफ्ट!

cristiano-ronaldo:-गिफ्ट-असावं-तर-असं…लाखात-एक,-ख्रिसमसच्या-मुहुर्तावर-रोनाल्डोला-गर्लफ्रेंडकडून-खास-गिफ्ट!

Ronaldo Georgina, rolls royce : आपल्या पायाच्या जादूने जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या (Football Lovers) हृदयावर राज्य करणाऱ्या रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जने (Georgina Rodriguez) त्याला ख्रिसमसच्या (Christmas) निमित्ताने खास भेट दिली आहे.

Updated: Dec 27, 2022, 01:14 AM IST

Ronaldo,Georgina, rolls royce

Cristiano Ronaldo: ख्रिस्तियानो रोनाल्डो हे फुटबॉल (Football) जगतातील एक भलं मोठं नाव… अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणून रोनाल्डोकडे (Cristiano Ronaldo) पाहिलं जातं. अनेक विक्रम नावावर असलेल्या या खेळाडूला मैदानात खेळताना पाहायला जगभरातील कोट्यवधी लोक उत्सुक असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणजे रोनाल्डो. याच रोनाल्डोवर अनेक तरूणी फिदा आहेत. (cristiano ronaldo girlfriend georgina rodriguez gifts him a rolls royce of 3 crore on christmas watch video)

आपल्या पायाच्या जादूने जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या (Football Lovers) हृदयावर राज्य करणाऱ्या रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जने (Georgina Rodriguez) त्याला ख्रिसमसच्या (Christmas) निमित्ताने खास भेट दिली आहे. रॉड्रिग्जने रोनाल्डोला एक आलिशान रोल्स रॉयस (Rolls-Royce) भेट म्हणून दिली. या कारची रक्कम सुमारे 3 कोटी रुपये आहे.

आणखी वाचा – ‘या’ क्लबने Cristiano Ronaldo ला दिली अब्जोंची ऑफर; रक्कम त्यापुढचे शून्यच मोजत बसाल

जॉर्जिना रॉड्रिग्जने तिच्या इन्टाग्राम अकाऊंटवर (Georgina Rodriguez Instragram) एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये रोनाल्डो त्याच्या परिवारासह दिसतोय. तर व्हिडिओमध्ये रोल्स रॉयस देखील दिसत आहे. ख्रिसमसच्या मुहुर्तावर रोनाल्डो आणि त्याच्या पत्नीने ही गाडी खरेदी केली.

पाहा Video –

दरम्यान, सुरूवातीला व्हिडिओमध्ये (Georgina Ronaldo Video) जॉर्जिना रॉड्रिग्ज दिसते. त्यानंतर त्यांच्या घरात तिचे मुलं बागडताना दिसत आहे. त्यानंतर ती सर्वांना बाहेर घेऊन जाते आणि सर्वांना सरप्राईज देते. गाडी पाहून रोनाल्डोला देखील आश्चर्याचा धक्का बसतो. वा्हववव… म्हणत रोनाल्डोची रिऑक्शन (Ronaldo Reaction) कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *