Crime: सौंदर्य, मादक अदा.. मुंबईतील महिला 'असं' लुटायची!

crime:-सौंदर्य,-मादक-अदा.-मुंबईतील-महिला-'असं'-लुटायची!

Woman robbed man of lakhs of rupees in Dombivli: डोंबिवली: डोंबिवली (Dombivli) मानपाडा पोलीस स्टेशनच्या परिसरात राहणारे महेश कृष्णा पाटील यांना फेसबुकवर (Facebook) महिलेशी मैत्री करणे चांगलंच महागात पडले आहे. फेसबुक, इन्स्टाग्रामवर मैत्री करून, सौंदर्याचा फायदा घेत व्यापारी आणि धनाढ्य पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, हॉटेलमध्ये जेवायला बोलावून, त्यांच्या सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून मौल्यवान वस्तू लुटून (Robbed) पसार झालेल्या महिलेला गोव्यातून (Goa) अटक करण्यात आली आहे. तसेच तिच्या साथीदारालाही गोव्यातून अटक करण्यात आली आहे. (taking advantage of her beauty woman robbed man of lakhs of rupees in dombivli)

यावेळी डोंबिवली पोलिसांनी एक रिव्हॉल्व्हर, सहा जिवंत काडतुसे, 16 मोबाइल, 11 सोनसाखळी, 2 घड्याळे, अंगठ्या, ब्रेसलेट आदी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ज्याची एकूण किंमत 20 लाख 81 हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. समृद्धी संतोष खडपकर असे महिला आरोपीचे नाव असून तिच्या साथीदाराचे नाव विलंदर विल्फड डेकोस्टा असे आहे.

डोंबिवलीतील महेश पाटील यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये फेसबुकच्या माध्यमातून समृद्धी खडपकरशी मैत्री केली. समृद्धीने महेशला खोणी गावाजवळील हॉटेलमध्ये जेवायला बोलावले, महेश बेडरूममध्ये जेवण करून वॉशरूममध्ये गेला. याच संधीचा फायदा घेत समृद्धीने महेशचे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर, मोबाईल फोन, सोन्याची चेन आणि 4 लाख 75 हजार रुपये रोख घेऊन पळ काढला.

महेशकडे समृद्धीचा पत्ता किंवा मोबाइल फोन नव्हता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महेश पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. महिलेकडून रिव्हॉल्व्हरचा गैरवापर होऊ शकते अशी तक्रारही त्यांनी यावेळी दिली.

प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून महिलेचा शोध सुरू केला. ती मुंबईतील खार भागात राहते, असे तिच्या फेसबुक अकाउंटवरून समजले. तेथे गेल्यानंतर समृद्धी तिच्या साथीदारासह गोव्याला गेल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी गोव्यात जाऊन समृद्धी आणि डिकोस्टा यांना अटक केली.

समृद्धी खडपकर ही महिला आपल्या सौंदर्याचा फायदा घेत फेसबुक, इन्स्टाग्रामवर सुंदर फोटो दाखवून पुरुषांशी मैत्री करायची, नंतर त्यांना आपल्या प्रेमात अडकवून हॉटेलमध्ये जेवायला बोलवायची. हॉटेलमध्ये रूम बुक करून वेळ काढायचा. तेव्हा समृद्धी पुरुषांचा शीतपेयात गुंगीचे औषध टाकून त्यांना बेशुद्ध करायची. नंतर महिला त्यांच्याजवळील दागिने, घड्याळ, रोख रक्कम, मोबाइल घेऊन पळून जायची.

या कामात तिला गोव्यात राहणारा डिकोस्टा नावाचा व्यक्ती मदत करत होता. आता या दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी एक रिव्हॉल्व्हर, सहा जिवंत काडतुसे, 16 मोबाइल फोन, 11 सोनसाखळ्या, दोन घड्याळे, अंगठ्या, बांगड्या असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्याची एकूण किंमत 20 लाख 81 हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील तपास मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पीआय शेखर बागडे, सहायक निरीक्षक अविनाश वनवे व त्यांचे पथक करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *