Coronavirus : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाने टेन्शन वाढवलं, नवा व्हेरिएंट उडवणार झोप

coronavirus-:-नव्या-वर्षाच्या-सुरुवातीलाच-कोरोनाने-टेन्शन-वाढवलं,-नवा-व्हेरिएंट-उडवणार-झोप

Coronavirus Update : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाने टेन्शन वाढवले आहे. भारतावर कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे चिंता वाढली आहे. दरम्यान, Omicron च्या XBB.1.5 व्हेरिएंटची खूप चर्चा होत आहे. चीनमध्ये एकीकडे BF.7 (BF.7) या उप-प्रकारामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत, तर दुसरीकडे अमेरिकेत XBB.1.5 या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.  तेव्हा आजपासून विमानतळांवर कोरोना नियम सक्तीचे करण्यात आले आहेत. आता RT-PCR टेस्टशिवाय भारतात प्रवेश मिळणार नाही. चीनसह सहा देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य करण्यात आला आहे. 

ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत असे सांगितले जात आहे की XBB.1.5 प्रकार BQ1 पेक्षा 120 टक्के वेगाने पसरतो. तज्ज्ञांनी असा दावा केला आहे की अमेरिकेमध्ये 40 टक्क्यांहून अधिक प्रकरणे ओमिक्रॉनच्या XBB.1.5 (Omicron Variant) प्रकारातील आहेत. याची लागण झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.  

चीनमध्ये कोनाचं थैमान

तर दुसरीकडे चीनमध्ये कोनानं थैमान घातले आहे.कोरोनाच्या नव्या लाटेत लाखो नागरिकांचा मृत्यू होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.नव्या वर्षात चीनमध्ये कोरोनाच्या अनेक लाटा येतील आणि रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होईल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. चीनसाठी हा अत्यंत कठीण काळ आहे अशी भावना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी व्यक्त केली आहे.

XBB.1.5 प्रकाराचा संसर्ग वेगाने पसरतो?

मिनेसोटा विद्यापीठातील विशेषज्ज्ञ डॉ. मायकेल ऑस्टरहोम यांनी सांगितले की, अमेरिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या 40 टक्क्यांहून अधिक रुग्ण हे XBB.1.5 प्रकारातील आहेत. XBB ची ओळख भारतात पहिल्यांदा ऑगस्ट महिन्यात झाली होती. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील विषाणूशास्त्रज्ञ अँड्र्यू पेकोझ यांनी सांगितले की, XBB.1.5 या व्हेरिएंटने संसर्ग होत आहे. यामुळे ते शरीरातील पेशींशी संपर्क आल्यानंतर याचा संसर्ग वेगाने पसरतो.

XBB.1.5 प्रकार धोकादायक का आहे?

एपिडेमियोलॉजिस्ट एरिक फीगेल-डिंग यांनी सांगितले की हे XBB.1.5 हा व्हेरिएंट XBB आणि BQ पेक्षा शरीराच्या प्रतिकारशक्तीपासून बाहेर पडण्यास सक्षम आहे. XBB.1.5 प्रकाराचा संसर्ग दर खूप जास्त आहे.

लसीचा प्रभाव कमी करु शकतो!

याव्यतिरिक्त, पेकिंग विद्यापीठातील सहायक प्राध्यापक युनलाँग रिचर्ड काओ यांनी सांगितले की XBB.1.5 हा व्हेरिएंट शरीरातील प्रतिपिंडांना कमकुवत करतो. त्याचवेळी, कोलंबिया विद्यापीठातील तज्ज्ञांनी सांगितले की XBB चे सर्व व्हेरिएंट कोविड लसीकरणाचा प्रभाव कमी करु शकतात. त्यामुळे धोका कायम आहे.

XBB.1.5 प्रकाराची वैशिष्ट्ये

XBB व्हेरिएंटची काही वैशिष्‍ट्ये इतर व्हेरिएंटसारखीच आहेत. वाहणारे नाक, ताप, घसादुखी, डोकेदुखी, सर्दी, शिंका येणे आणि खोकला ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *