Cooking Tips: वरण-भातासोबत खा बटाटयाच्या कुरकुरीत चकत्या…5 मिनिटात होतील तयार

cooking-tips:-वरण-भातासोबत-खा-बटाटयाच्या-कुरकुरीत-चकत्या…5-मिनिटात-होतील-तयार

ही रेसिपी करायला अगदी सोपी आणि झटपट अशी आहे (  (Cooking Tips & Hacks) ) त्यामुळे गरमागरम वरण भात ताटात वाढेपर्यंत खमंग असे काप बनून सुद्धा तयार होतील . चला तर मग जाणून घेऊया झटपट बटाट्याचे काप कसे करूया. (how to make batata kap recipe)

Updated: Dec 23, 2022, 03:53 PM IST

Cooking Tips: वरण भात हा पदार्थ मुख्यतः महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घरी जवळपास रोजच होणारा पदार्थ आहे. पण हे ही तितकंच खरं आहे,रोज रोज नुसता वरण भात खायला कंटाळा येतो मग अश्या वेळी चवीला म्हणून भाजी कधी पापड तर कधी लोणच्याचा बेत असतो पण तरीही रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल  तर आज तुमच्यासाठी घेऊन आलोय एकदम हटके नवीन आणि 5 मिनिटात होणारी बटाट्याची चकरी.याला बटाट्याचे काप सुद्धा म्हणतात . ही रेसिपी करायला अगदी सोपी आणि झटपट अशी आहे (  (Cooking Tips & Hacks) ) त्यामुळे गरमागरम वरण भात ताटात वाढेपर्यंत खमंग असे काप बनून सुद्धा तयार होतील . चला तर मग जाणून घेऊया झटपट बटाट्याचे काप कसे करूया. (how to make batata kap recipe)

यासाठी लागणारं साहित्य पाहूया

  • ३ ते ४ बटाटे
  • १/४ कप तांदळाचे पीठ, 
  • तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लोअर
  • १ चमचा लाल तिखट
  • चिमूटभर हळद पावडर
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल

कृती

बटाट्याचे काप करण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात तांदळाचं पीठ, लाल तिखट, हळद आणि मीठ एकञ करून घ्या हाताने सर्व मिश्रण व्यवस्थित एकञ करा आता आणखी एक आकाराने मोठं असं भांड घ्या

त्यात ३ कप पाणी घाला एकीकडे बटाट्याची साल काढून त्याचे बारीक काप करून घ्या आणि हे सर्व काप पाण्यात टाकून द्या. आता एकीकडे तवा गरम करा त्यात थोडंसं तेल घाला ताव मंद आचेवर चांगल गरम होऊ द्या.

पाण्यात घातलेले बटाटे किचन टॉवेलच्या मदतीने सुके करून घ्या, काप पूर्ण सुके करू नका थोडेसे ओले राहूद्या, जेणेकरून तांदळाचं मिश्रण बटाट्याला व्यवस्थहीत चिकटेल.

तांदळाच्या पिठात व्यवस्थित घोळून आता या चकत्या तव्य्वर मंद आचेवर दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या. दोन्ही बाजूने सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजलेत कि झालं गरमागरम बटाट्याचे काप तयार हे तुम्ही वरण भातासोबत खाऊ शकता. 

इतकंच काय तर टिफीनलासुद्धा हा उत्तम पर्याय आहे . त्यामुळे लवकरात लवकर काप करून पहा आणिआम्हाला  कळवा.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *