Cooking Tips: घरी ढाबा स्टाईल टम्म फुगलेले भटुरे कसे बनवायचे ? ही आहे सोपी रेसीपी

cooking-tips:-घरी-ढाबा-स्टाईल-टम्म-फुगलेले-भटुरे-कसे-बनवायचे-?-ही-आहे-सोपी-रेसीपी

cooking tips भटुरे एकदम ढाबा स्टाईल बनवायचे असतील तर पीठ मळताना (easy recipe of making bhatura) त्यात उकडलेला बटाटा किंवा पनीर कुस्करून घालावे.  महत्वाची गोष्ट म्हणजे तेल व्यवस्थित गरम झाल्यावरच त्यात भटुरे सोडावेत

Updated: Dec 29, 2022, 04:58 PM IST

Cooking Tips : ढाब्यावर जेवायला आपल्याला खूपच आवडतं. कोणास ठाऊक कशी पण ढाब्यावर जेवणाची चव किती अप्रतिम असते, आपण जेव्हा बाहेर हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर (hotel food) जेवायला जातो तेव्हा काही उत्तर भारतीय पदार्थमुख्यतः ऑर्डर करतो ज्यात रोटी पनीर सब्जी (Paneer Subji) असते कधी इतर पदार्थ पण काही वेळा आणि बऱ्याचदा ऑर्डर केला जाणारा पदार्थ आहे तो म्हणजे छोले भटुरे… छोले भटुरे नुसतं नाव जरी ऐकलं तरी टोबद्दल पाणी सुटतं, उत्तर भारतातील सर्वात फेमस अशी ही डिश आहे, पूर्वी काही ठराविक ठिकाणी छोले भटुरे मिळायचे पण आजकाल प्रत्येक हॉटेलमध्ये छोले भटुरे  मिळतातच… (Easy recipe to make Dhaba Style Chole Bhature)

हे तुम्हाला माहित असेलच ना,छोले म्हणजे काबुली चणे. पण ढाब्यावर ते एक विशिष्ठ पद्धतीने बनवले जातात. त्यासोबत खाण्यासाठी एक विशिष्ट रोटी चा प्रकार ज्याला भटुरे म्हणतात, जो मैद्या आणि बटाटा मिक्स करून बनवले जातात,  

पण बाहेरच खाणं म्हणजे आरोग्याला हानी त्यामुळे घरी बनवण्याचा प्रयत्न कधीना कधी तुम्ही केलाच असेल पण बेत फसतो, पण आज जाणून घेऊया ढाबा स्टाईल अस्सल चवदार छोले भटुरे घरीच बनवण्याची सोपी रेसिपी. 

भटुरे बनविण्याचे साहित्य 

  •  मैदा – १ वाटी
  •  बटाटे – ३ (उकडून घ्या)
  •  तेल 
  • मीठ 

कृती 

भटुरे बनवण्यासाठी सर्वात आधी मैदा आणि उकडलेले बटाटे एकत्र कुस्करून घ्या एक चमचा तेल घाला आणि घट्ट अशी कणिक मळून घ्या. कणकेचे छोटे गोळे बनवून घ्या आणि भटुरे लाटून घ्या..कढईत तेल गरम करून घ्या आणि त्यात भटुरे तळून घ्या. 

काही खास टीप जे तुमचे भटुरे परफेक्ट बनवतील

  •  भटुरे बनवताना  7-8  ब्रेड स्लाइस कुस्करून घाला. असं केल्याने भटूऱ्याचे पीठ रात्रभर भिजवत ठेवण्याची काहीच गरज नसणार आहे.  
  •  भटूऱ्याचे पीठ  मळताना त्यात दही घातलात तर ते मऊसूत बनतात. 
  • . भटूऱ्याचे कणीक मळताना त्यात दही घातल्याने भटुरे मऊसूत बनतात
  •  भटुरे एकदम ढाबा स्टाईल बनवायचे असतील तर पीठ मळताना  त्यात उकडलेला बटाटा किंवा पनीर कुस्करून घालावे.  महत्वाची गोष्ट म्हणजे तेल व्यवस्थित गरम झाल्यावरच त्यात भटुरे सोडावेत आणि दोन्ही बाजूनी खरपूस तळून घ्यावे. 
  •  भटुरे आणखी व्यवस्थित येण्यासाठी पिठात रवा घाला यामुळे भटुरे आणखी खुसखुशीत व्हायला मदत होईल. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *