Churchgate Station : चर्चगेट रेल्वे स्टेशनच्या नावामागे हा आहे इतिहास; वाचा,..

churchgate-station-:-चर्चगेट-रेल्वे-स्टेशनच्या-नावामागे-हा-आहे-इतिहास;-वाचा,.

मुंबई, 6 डिसेंबर : मुंबई हे देशातील नव्हे तर जगातील महत्त्वाच्या शहरांपैकी एक महत्त्वाचं शहर मानलं जातं. या शहराला ऐतिहासिक शहर म्हटले जाते. याच मुंबईतील अनेक प्रसिद्ध वास्तू आहेत. ज्याठिकाणी देशाविदेशातील हजारो पर्यटक दरवर्षी भेट देतात. या मुंबईला मायानगरी असेही म्हटले जाते.

मग याच मायानगरी असलेल्या मुंबईत एक चर्चगेट नावाचे रेल्वे स्टेशन आहे. येथील प्रत्येक ठिकाणाच्या नावामागे रंजक कथा ऐकायला मिळतात. याचप्रमाणे चर्चगेट नावाच्या रेल्वे स्थानकाचीही एक कथा आहे. मग हे चर्चगेट नाव कसे पडले ते जाणून घेऊया.

मुंबईतील कुलाब्यात वुड हाऊस चर्च आहे. हे चर्च अगोदर फक्त कॅथेड्रल चर्च या नावाने ओळखले जात असे. सध्या जिथे चर्चगेट स्टेशन आहे, त्याच्या अगदी समोर हे चर्च होते. या चर्चगेट स्टेशनमध्ये येणारी गाडी अगदी चर्चच्या गेटसमोर येऊन थांबत असे. त्यामुळे या चर्चच्या दारात म्हणजेच गेटपर्यंत येणारे स्टेशन म्हणून त्याचे नाव चर्चगेट स्टेशन असे पडले.

हेही वाचा – इतिहासातील BMC : 235 फुट उंच, बांधकामाला लागले तब्बल 4 वर्ष, काय आहे BMC च्या भव्य दिव्य इमारतीचा इतिहास?

दरम्यान, नंतर कालांतराने या रचनेत बदल झाला. चर्चगेट स्टेशनसमोर रहदारीसाठी रस्ता झाला आणि चर्च मागे गेले. तसेच काही काळ हे चर्च भुलेश्वर परिसरात हलवण्यात आले. मग पुन्हा ते चर्चगेट येथील मूळ जागेत आले. मात्र, या भागातील रहदारी वाढत गेल्यामुळे चर्चमध्ये येणाऱ्या लोकांची वाहने वाहतुकीसाठी अडथळा ठरू लागली. त्यामुळे पुन्हा चर्चसाठी पर्यायी जागेचा शोध सुरू झाला. यानंतर अखेर वुडहाऊस चर्च कुलाब्यामध्ये कायमस्वरूपी हलवण्यात आले.

चर्च

चर्च

मुंबईतील उच्चभ्रू वस्तीमध्ये हे चर्च आहे. हे चर्च आजही आपली वेगळी ओळख जपून आहे. चर्चच्या छतावर चित्रे काढण्यात आली आहेत. ही चित्रे गॉथिक वास्तुशैलीचा अप्रतिम नमुना आहेत. नाताळ सणानिमित्त अतिशय सुंदररीत्या या चर्चची सजावट करण्यात येते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *