Chandrababu Naidu: चंद्राबाबू नायडू यांच्या सभेत थरार! आंध्र प्रदेशात पुन्हा चेंगराचेगरी होऊन तिघांचा मृत्यू

chandrababu-naidu:-चंद्राबाबू-नायडू-यांच्या-सभेत-थरार!-आंध्र-प्रदेशात-पुन्हा-चेंगराचेगरी-होऊन-तिघांचा-मृत्यू

आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू यांच्या जाहीर चेंगराचेंगरी होऊन तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 28 डिसेंबर 2022 रोजी नेल्लोर जिल्ह्यातील कंदुकुर येथे अशीच घटना घडली होती.

Updated: Jan 1, 2023, 09:48 PM IST

Stampede in Andhra Pradesh: टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू(chandrababu naidu) यांच्या सभेत पुन्हा एकदा चेंगराचेंगरी झाली आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू यांच्या जाहीर चेंगराचेंगरी होऊन तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 28 डिसेंबर 2022 रोजी नेल्लोर जिल्ह्यातील कंदुकुर येथे अशीच घटना घडली होती. चंद्राबाबू नायडू यांच्या रोड शो ला तुफान गर्दी झाली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरी सात जणाचा मृत्यू झाला होता(Stampede in Andhra Pradesh). 

रविवारी गुंटूर जिल्ह्यातील विकास नगरमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या राजकीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला देखील मोठी गर्दी झाली होती. यावेळी चेंगराचेंगरी होऊन तीन जणांचा मृत्यू झाला आहे.  एका आठवड्यात अशा प्रकारच्या दोन घटना घडल्या आहेत. यामुळे चंद्राबाबू नायडू यांच्या राजकीय कार्यक्रमाला होत असलेल्या गर्दीमुळे जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

दरम्यान,  नेल्लोर जिल्ह्यातील कंदुकुर येथे  घडलेल्या घटनेनंतर चंद्राबाबू यांनी एनटीआर ट्रस्टच्या माध्यमातून मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची आर्थिक मदत आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे आश्वासन दिले होते.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *