CBSE 10वी-12वी परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कधीपासून परीक्षा?

cbse-10वी-12वी-परीक्षेचे-संपूर्ण-वेळापत्रक-जाहीर,-कधीपासून-परीक्षा?

CBSE Board Date Sheet 2023 in details: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने गुरुवारी परीक्षांची तारीखपत्रक जाहीर केले. माहितीनुसार, 10वी आणि 12वीच्या परीक्षा ( 10th 12th exam) 15 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार आहेत. (cbse 10th 12th exam datesheet released paper will start from february 15 see full schedule)

CBSE ने शैक्षणिक सत्र 2022-23 साठी इयत्ता 10वी आणि 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा आधीच जाहीर केल्या आहेत. बोर्ड 02 जानेवारी ते 14 जानेवारी 2023 दरम्यान इयत्ता 10 वी आणि 12 वी साठी प्रॅक्टिकल घेईल.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने डेटशीट प्रसिद्ध केल्यानंतर आता विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि cbse.nic.in वर जाऊन त्यांची डेटशीट तपासू आणि डाउनलोड करू शकतील.

10वीच्या परीक्षेचं वेळापत्रक

10वीच्या परीक्षेचं वेळापत्रक

जारी केलेल्या डेटशीटनुसार, CBSE इयत्ता 10 साठी 16 फेब्रुवारीला रिटेल, सुरक्षा, ऑटोमोटिव्ह, पर्यटन, कृषी, बँकिंग आणि विमा, हिंदुस्थानी संगीत, 17 फेब्रुवारीला अकाउंटन्सी, 20 फेब्रुवारीला भाषा, 27 फेब्रुवारीला इंग्रजी, 4 मार्चला विज्ञान, 6 मार्च रोजी गृहविज्ञान, 9 मार्च रोजी व्यवसाय घटक, 11 मार्च रोजी संस्कृत, 13 मार्च रोजी संगणक, आयटी, एआय, 15 मार्च रोजी सामाजिक विज्ञान, 17 मार्च रोजी हिंदी आणि 21 मार्च रोजी गणिताचा पेपर असणार आहे.

12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक

12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक

डेटशीट कशी डाउनलोड करणार?

  • स्टेप 1: डेटशीट जारी केल्यानंतर, सर्वप्रथम CBSE च्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्या.

  • स्टेप 2: मुख्यपृष्ठावर, CBSE 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा 2023 च्या डेटशीटची PDF लिंक मिळेल.

  • स्टेप 3: विद्यार्थी त्यावर क्लिक करून 10वी किंवा 12वी बोर्ड परीक्षा डेटशीट तपासू आणि डाउनलोड करू शकतील.

  • स्टेप 4: विद्यार्थी डेटशीटची प्रिंटआउट घेऊ शकतील आणि ते त्यांच्याकडे ठेवू शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *