CBI Raids

कोलकाता; वृत्तसंस्था : बँकांकडून कर्ज घेऊन बनावट कागदपत्रे सादर करीत ही रक्कम इतर खात्यांत वळती करून बँकांची चार हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कॉर्पोरेट पॉवर लिमिटेड या कंपनीचे संचालक व इतरांवर सीबीआयने गुन्हे दाखल केले असून मुंबई, नागपूर, कोलकातासह 16 ठिकाणी छापे टाकले आहेत. (CBI Raids)

शिखर बँक असलेल्या युनियन बँकेने याबाबत फिर्याद दिली असून या प्रकरणात शनिवारी ही कारवाई करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॉर्पोरेट पॉवर लिमिटेडने 20 बँकांकडून चार हजार 39 कोटी 87 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या संदर्भात बनावट कागदपत्रे कंपनीने बँकांना सादर केली व व्यवहारांचेही बनावट कागद तयार करून ही रक्कम अनेक डमी खात्यांवर वळती करण्यात आली. या कंपनीने कर्जाची परतफेडही केली नाही. त्यामुळे युनियन बँकेने बुडित कर्जाच्या यादीत याचा समावेश केला. कागदपत्रांच्या छाननीत प्रकार उघडकीस आल्यानंतर युनियन बँकेने सीबीआयकडे धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यानुसार मनोज जयस्वाल, अभिषेक जयस्वाल, अभिजित जयस्वाल, राजीव कुमार, बिशाल जयस्वाल, मुन्ना कुमार जयस्वाल, पीएन कृष्णन, राजीव गोयल, अरुण कुमार श्रीवास्तव, एस. एन. गायकवाड, प्रेम प्रकाश शर्मा आणि अरुण गुप्ता यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. (CBI Raids)

शनिवारी सीबीआयच्या पथकांनी देशभरात 16 ठिकाणी कंपनीच्या संचालकांवर छापे टाकले. नागपूर, मुंबई, रांची, कोलकाता, दुर्गापूर, गाझियाबाद, विशाखापट्टणम येथे सीबीआयच्या पथकांनी छापे टाकून तपासणी सुरू केली आहे. (CBI Raids)

टेरर फंडिंग प्रकरणात ‘एनआयए’चे छापासत्र

नवी दिल्ली : टेरर फंडिंग प्रकरणात एनआयएने शनिवारी एकाच वेळी जम्मू-काश्मीर, पंजाब आणि दिल्लीत 17 ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात एनआयएच्या हाती काय लागले व किती जणांना अटक करण्यात आली याचा तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. दहशतवादाला आर्थिक रसद पुरवणार्‍यांच्या नाड्या आवळण्यासाठी एनआयएने ही कारवाई केली. त्यात काश्मिरातील दहशतवादी तसेच खलिस्तानी दहशतवाद्यांना आर्थिक मदत देणार्‍यांवर हे छापे टाकण्यात आले आहेत. पंजाबमध्ये बब्बर खालसा, खलिस्तान लिबरेशन फोर्स आणि इंटरनॅशनल शीख यूथ फेडरेशन या तीन बंदी घातलेल्या संघटनांचे पदाधिकारी व समर्थक एनआयएच्या निशाण्यावर आहेत. काश्मिरात अनंतनाग, कुलगाम, बेहरामपुरा, सोपोर, अवंतीपुरा, जम्मू आणि दिल्ली या ठिकाणी काश्मिरी दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करणार्‍यांवर एनआयएने छापे टाकले आहेत. एनआयएच्या पथकासोबत सीआयएसएफच्या सशस्त्र जवानांच्या तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या होत्या.

अधिक वाचा :

  • Kanpur Money Heist : कानपूरमध्ये भुयार खोदून स्टेट बँकेतील एक कोटींचे सोने लंपास
  • Online Fraud : ऑनलाईन घोटाळ्यातील ४४ लाख काही तासात परत; सायबर पोलिसांची यशस्वी कामगिरी
  • Coronavirus In China : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक; डिसेंबर महिन्यात २५ कोटीहून अधिक लोक संक्रमित