Bigg Boss 16: तब्येत नाही तर

Abdu Rozik
Image Credit source: Voot
मुंबई: बिग बॉस 16 या रिॲलिटी शोच्या शुक्रवारच्या एपिसोडमध्ये अब्दू रोझिक घराबाहेर पडला. अब्दू हा या शोच्या पहिल्या एपिसोडपासून चर्चेत आहे. इतकंच नव्हे तर त्याच्यामुळेच बिग बॉसला टीआरपी मिळतोय, असं नेटकऱ्यांनी म्हटलं. सर्वांचा लाडका स्पर्धक असलेला अब्दू जेव्हा बिग बॉसच्या घराबाहेर गेला, तेव्हा सर्वच स्पर्धकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला. प्रकृतीच्या कारणास्तव त्याने शो सोडला, अशी चर्चा होती. मात्र आता बिग बॉसच्या या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. बिग बॉसने अब्दूच्या जाण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.
‘आजपर्यंत या शोमध्ये कधीच काही लपवलं गेलं नाही. अब्दूच्या मॅनेजमेंट कंपनीने निर्मात्यांशी संपर्क साधला. हा त्याच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा निर्णय आहे. एका व्हिडीओ गेमसाठी अब्दूचे लाइव्ह मोशन कॅप्चर करण्याची गरज आहे. त्याच्या करिअरच्या या निर्णयात बिग बॉसचा शो कोणतीही अडचण निर्माण करणार नाही. त्यामुळे त्यांना शो बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली,’ असं बिग बॉसने स्पर्धकांना सांगितलं.
अब्दू त्याच्या मर्जीने बिग बॉसच्या घरात परत येऊ शकतो, असंही स्पष्ट करण्यात आलं. सोशल मीडियावर अब्दूची साथ देण्यासाठी ट्रेंड सुरू झाला. बिग बॉसच्या निर्मात्यांनी त्यांना घरातून काढलं, असा आरोप काही युजर्सनी केला. त्यामुळे अनेकांनी वाहिनीवरही राग व्यक्त केला.
अब्दू हा तजाकिस्तानचा गायक आहे. पहिल्या एपिसोडपासूनच तो प्रेक्षकांचा आवडता स्पर्धक बनला. लोकप्रियतेच्या यादीत तो पहिल्या आठवड्यापासून अग्रस्थानी आहे. 19 वर्षीय अब्दू कधी त्याच्या गायकीमुळे तर कधी टिना दत्तासोबतच्या रोमान्समुळे चर्चेत आलेला.