Bigg Boss 16 | अब्दु रोजिक याचे चाहते आनंदी, छोटा भाईजान परत करणार धमाका

bigg-boss-16-|-अब्दु-रोजिक-याचे-चाहते-आनंदी,-छोटा-भाईजान-परत-करणार-धमाका

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Updated on: Dec 25, 2022 | 7:13 PM

गेल्या आठवड्यामध्ये सर्वांचा आवडता अब्दु हा काही कारणासाठी बिग बाॅसच्या घराबाहेर पडला होता.

Bigg Boss 16 | अब्दु रोजिक याचे चाहते आनंदी, छोटा भाईजान परत करणार धमाका

मुंबई : बिग बाॅसचा या आठवड्याचा विकेंडचा वार धमाकेदार ठरला आहे. या आठवड्यामध्ये सलमान खान याने घरातील सदस्यांसोबतच प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन केले. सलमान खान याने प्रियंका चाैधरीचा क्लास घेतला. कारण तिने अंकितला वाचवण्यासाठी 25 लाख घेतले नाहीत. परंतू नेहमीप्रमाणेच तिने साजिद खान याला दोष देण्यास सुरूवात केली. यावरच सलमान याने प्रियंकाच्या क्लास घेतला आहे. विकेंडच्या वारमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी बिग बाॅसच्या घरात रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख देखील दाखल झाले होते.

गेल्या आठवड्यामध्ये सर्वांचा आवडता अब्दु हा काही कारणासाठी बिग बाॅसच्या घराबाहेर पडला होता. इतकेच नाहीतर यावर बिग बाॅसने सांगितले होते की, अब्दु आता जातोय. परंतू तो लवकरच परत येईल.

अब्दुला परत एकदा घरामध्ये घ्यायचे की, नाही हा सर्व निर्णय घरातील सदस्यांच्या हातामध्ये असेल. आताच सोशल मीडियावर शेअर झालेल्या प्रोमोमध्ये अब्दु हा बिग बाॅसच्या घरात परत आल्याचे दिसत आहे.

अब्दु याला परत येताना पाहूण घरातील सदस्य आनंदी झाल्याचे प्रोमोमध्ये दिसत आहे. शिव ठाकरे आणि अब्दु गळाभेट घेतात. यावेळी अब्दु शिवला लव्ह यू ब्रो म्हणताना दिसत आहे.

Ankii -: “Wo ek mountain, ek rock ke tarha khadi hai,Pri is a very stong Contestannt and I see her as a winner of BB16” 🔥❤️

And Ankii We See You as a Finalist 🥺❤️

BB WE WANT ANKIT BACK#PriyAnkit #BiggBoss16 pic.twitter.com/zN9thBUHVp

— 𝐓𝐞𝐚𝐦 𝐏𝐫𝐢𝐲𝐚𝐧𝐤𝐢𝐭 𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥 💫 (@PriyAnkitFC) December 25, 2022

शिव ठाकरे, निम्रत काैर, एमसी स्टॅन, साजिद खान यांची अब्दु गळाभेट घेतो. आता परत एकदा छोटा भाईजान बिग बाॅसच्या घरात धमाका करण्यासाठी आलाय. हा प्रोमो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय.

अब्दुला बिग बाॅसच्या घरामध्ये परत एकदा पाहून त्याचे चाहते देखील आनंदी झाले आहेत. अब्दुला घरातील स्पर्धेक देखील मिस करत होते. आता अब्दु बिग बाॅसच्या घरात धमाका करण्यास तयार आहे.

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *