Big Breaking : एका युगाचा अंत; ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचं निधन

big-breaking-:-एका-युगाचा-अंत;-ब्रिटनच्या-महाराणी-एलिझाबेथ-यांचं-निधन

नवी दिल्ली, 8 सप्टेंबर : Britain Queen Elizabeth : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांची तब्येत जास्तच बिघडल्याचं वृत्त समोर आलं होतं. अखेर आज उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.  क्वीन एलिझाबेथ या एपिसोडिक मोबिलिटी आजाराने ग्रस्त होत्या. गेल्या वर्षी त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिनबरा प्रिन्स फिलिप (Duke of Edinburgh, Prince Philip) यांचं निधन झालं होतं.

प्रिन्स फिलिप यांचं त्यांच्या 100व्या वाढदिवसाच्या केवळ काही आठवडे आधी निधन झालं होतं. त्यानंतर वयाच्या 96 व्या वर्षी महाराणी एलिजाबेथ यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे इंग्लंडवर शोककळा पसरली आहे. सारे नागरिक दु:खात आहेत. सर्वाधिक काळ इंग्लंडच्या महाराणी पदावर राहिल्याचा मान त्यांना मिळाला आहे.

Britain’s Queen Elizabeth passes away at the age of 96 years at Balmoral castle, Scotland

(File Pic) https://t.co/PglwErVaWe pic.twitter.com/GKYYt1177S — ANI (@ANI) September 8, 2022

जानेवारी महिन्यात विंडसर कॅसलमधील थेम्स नदीच्या किनाऱ्यावरील राणी एलिझाबेथ यांच्या राजहंसांच्या कळपातील 26 हंसांना मारुन टाकण्यात आलं होतं. या राजहंसांना बर्ड फ्लू (Bird Flu) झाल्याने मारून टाकण्यात आले होतं. यानंतर त्या खूप दु:खी झाल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *