Ben Stokes: कोण चालवणार धोनीचा वारसा? 'या' खेळाडूच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ!

ben-stokes:-कोण-चालवणार-धोनीचा-वारसा?-'या'-खेळाडूच्या-गळ्यात-पडणार-कॅप्टन्सीची-माळ!

New Captain of CSK: महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) वेळेनुसार निर्णय घ्यावा लागेल, असं चेन्नईचे सीईओ विश्वनाथ (CEO Vishwanath) यांनी म्हटलं आहे.  

Updated: Dec 24, 2022, 11:08 PM IST

IPL 2023: आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामासाठी कोची येथे रंगलेल्या लिलावात (IPL Mini Auction) अनेक दिग्गज खेळाडूंवर बोली लावण्यात आली. मिनी लिलावात मेगा लिलावाची झलक पहायला मिळाली. 10 संघांनी आपापल्या क्षमतेनुसार खेळाडू आयात केले आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये खेळण्यासाठी बेन स्टोक्सला (Ben Stokes) 16.25 कोटी रुपये खर्च करून सीएसकेने (Chennai Super Kings) आपल्या संघात समावून घेतलं. त्यामुळे आता चेन्नईला नवा कॅप्टन (New Captain of CSK) मिळाला, अशी चर्चा सुरू असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता चेन्नईकडून मोठं वक्तव्य करण्यात आलंय. (Will Ben Stokes take over CSK captaincy from MS Dhoni after IPL Mini Auction marathi news)

बेन स्टोक्सला (Ben Stokes) घेऊन आम्ही खूप उत्साहित होतो आणि आम्ही भाग्यवान होतो कारण शेवटी बेन स्टोक्स आम्हाला मिळाला. आम्हाला एक ऑलराऊंडर खेळाडू हवा होता आणि एमएस धोनीला देखील खूप आनंद झाला. कर्णधारपद (Captaincy) हा एक पर्याय आहे पण महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) वेळेनुसार निर्णय घ्यावा लागेल, असं चेन्नईचे सीईओ विश्वनाथ (CEO Vishwanath) यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता चर्चेला उधाण आलंय.

मागील आयपीएल हंगामामध्ये (IPL) आंतरराष्ट्रीय सामन्यामुळे बेन स्टोक्स उपलब्ध नव्हता. मात्र, त्याआधी देखील त्याने आयपीएलमध्ये जलवे दाखवले आहेत. राजस्थान रॉयल्सकडून (RR) खेळणारा स्टोक्स धोनीच्या रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून (RPS) देखील खेळला आहे. त्यामुळे धोनीच्या रणनितीची चांगली पारख स्टोक्सला आहे.

आणखी वाचा – IPL 2023 Auction : आयपीएलच्या 15 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच दिसणार ‘हा’ धडाकेबाज खेळाडू!

दरम्यान, चालू हंगामात मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) हा भारताचा सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला. मयांकला लिलावात सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) संघानं आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं. लिलावात सर्वाधिक रक्कम ही विदेशी खेळाडूंना मिळाल्याचं दिसून आलंय. कॅमेरून ग्रीनला (cameron green) मुंबई इंडियन्सच्या (MI) संघाने 17.50 कोटी रुपयांच्या रकमेवर संघात सामील करता आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *