Astrology:जाेतिष्यशास्त्राच्या दृष्टीने कसे असणार 2023 वर्ष, वार्षाचा पहीला दिवस आहे विशेष महत्वाचा

astrology:जाेतिष्यशास्त्राच्या-दृष्टीने-कसे-असणार-2023-वर्ष,-वार्षाचा-पहीला-दिवस-आहे-विशेष-महत्वाचा

ज्योतिषीय गणनेनुसार, 1 जानेवारी 2023 रोजी न्यायाची देवता शनी आणि बृहस्पति आपापल्या राशींमध्ये वास्तव्य करणार आहेत.

Astrology:  जाेतिष्यशास्त्राच्या दृष्टीने कसे असणार 2023 वर्ष, वार्षाचा पहीला दिवस आहे विशेष महत्वाचा

जाेतिष्यशास्त्र

Image Credit source: Social Media

मुंबई, 2023 च्या सुरुवातीला तीन अद्भुत योग जुळून येत आहेत. नवीन वर्ष 2023 ची सुरुवात (2023 Astrology) सर्वार्थ सिद्धी योग, शिव योग आणि अश्विनी नक्षत्राने होणार आहे. तसेच या दिवशी शनि, बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे मकर राशीमध्ये त्रिग्रही योग असेल. दुसरे, अश्विनी हे एकूण 27 नक्षत्रांपैकी पहिले नक्षत्र आहे. तिसरे म्हणजे, वर्षाचा पहिला दिवस रविवार आहे, ज्याचा स्वामी स्वतः सूर्यदेव आहे. ग्रह आणि नक्षत्रांची अशी स्थिती वर्षाच्या सुरुवातीला लोकांना उत्साही बनविण्याचे काम करेल.

नवीन वर्ष 2023 खास का आहे?

हिंदू दिनदर्शीकेनुसार 2023 मध्ये एकूण 162 सर्वार्थ सिद्धी योग असतील. याशिवाय 143 रवियोग, 33 अमृत सिद्धी योग यांचाही योग असेल. 2023 मध्ये 14 पुष्य योग (नक्षत्र) असतील. पुष्य नक्षत्रात खरेदी करणे खूप शुभ असते. मार्च आणि डिसेंबर महिन्यात दोनदा पुष्य योग तयार होईल. नवीन वर्षात जानेवारी महिन्यात सर्वार्थ सिद्धी योग जास्तीत जास्त 16 वेळा तयार होईल. याशिवाय मार्च, एप्रिल, जुलै आणि डिसेंबरमध्ये 14-14 वेळा जास्तीत जास्त रवि योग तयार होतील. त्याचबरोबर एप्रिलमध्ये जास्तीत जास्त सहा वेळा अमृत सिद्धी योग तयार होणार आहे.

कशी असेल शनि-गुरूची स्थिती

2023 मध्ये, न्यायाची देवता शनि 17 जानेवारी रोजी कुंभ राशीत प्रवेश करेल आणि वर्षभर या राशीत राहील. त्याच वेळी देव गुरु गुरु 21 एप्रिलपर्यंत स्वराशी मीन राशीत विराजमान राहील. यानंतर संपूर्ण वर्ष मेष राशीत राहील. 29 जून 2023 ते 23 नोव्हेंबर 2023 या कालावधीत चातुर्मास असेल, त्यामध्ये विवाह कार्यक्रमास मनाई असेल.

वर्ष 2023 चा पहिला दिवस का आहे खास?

नवीन वर्ष 2023 च्या पहिल्या तारखेला अनेक विशेष योगायोग घडत आहेत. नक्षत्रांच्या क्रमाने अश्विनी या पहिल्या नक्षत्राने वर्षाची सुरुवात होत आहे. राशिचक्र चिन्हांच्या क्रमाने पहिले चिन्ह मेष आहे आणि आठवड्याच्या क्रमाने पाहिला दिवस देखील रविवार असेल. अशा स्थितीत वर्षाची सुरुवातही समृद्धी, प्रगती आणि भरभराटीचे संकेत देणारी आहे. सूर्याच्या प्रभावाने भारत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विशेष काम करेल.

शनि आणि गुरु स्वराशीत असणार

ज्योतिषीय गणनेनुसार, 1 जानेवारी 2023 रोजी न्यायाची देवता शनी आणि बृहस्पति आपापल्या राशींमध्ये वास्तव्य करणार आहेत. वर्षाच्या सुरुवातीला शनी स्वराशी मकर राशीत असेल. शुक्र आणि बुध या अनुकूल ग्रहांच्या संयोगाने त्रिग्रही योग तयार होईल. म्हणजेच, मकर राशीच्या लोकांना व्यवस्थापन, पैसा, भौतिक सुखाशी संबंधित गोष्टींचे लाभ मिळू शकतात. यासोबतच गुरू स्वराशी मीन राशीत असेल. ज्योतिषांच्या मते, जेव्हाही एखादा ग्रह स्वतःच्या राशीत किंवा घरामध्ये बसतो तेव्हा तो नेहमी शुभ फल देतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *