Arjun Tendulkar : 'लिहून ठेव, तू जगातील महान ऑलराऊंडर बनशील'

arjun-tendulkar-:-'लिहून-ठेव,-तू-जगातील-महान-ऑलराऊंडर-बनशील'

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकरने रणजी ट्रॉफीमध्ये दणदणीत पदार्पण केलंय.

अर्जून तेंडुलकरने गोव्याकडून खेळताना राजस्थानविरुद्ध शतक ठोकलं.

अर्जून तेंडुलकरच्या या खेळीनंतर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी त्याला खास मेसेज पाठवला.

योगराज सिंग यांनी ब्रिटनमधून अर्जून तेंडुलकरची पाठ थोपटत हुरुप वाढवणारा मेसेज दिलाय.

योगराज सिंग यांनी म्हटलेलं की, ‘बेटा, खूपच सुंदर बॅटिंग केलीस. मी सांगतोय ते लिहून ठेव. एक दिवस तू जगातील महान ऑलराऊंडर होशील.’

सचिन तेंडुलकरने युवराज सिंगकडे अर्जूनच्या ट्रेंनिगबद्दल विनंती केली होती.

योगराज सिंग यांनी अर्जूनला ट्रेनिंग द्यावी असं सचिनने युवराज सिंगला म्हटलं होतं.

सचिनच्या विनंतीनंतर अर्जून तेंडुलकरला योगराज सिंग यांनी ट्रेनिंग दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *