Anil Deshmukh : 100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना जेल की बेल? आज महत्त्व

मुंबई, 12 डिसेंबर : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी वसुली सीबीआय प्रकरणात दाखल जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालय निकाल देणार आहे. देशमुख यांना जामीन मिळणार की त्यांना जेलमध्ये मुक्काम वाढणार याचा फैसला आज कोर्ट करणार आहे.
सीबीआय तपास करत असलेल्या भ्रष्टाचार आणि वसुली प्रकरणात जामीनासाठी युक्तिवाद पूर्ण झालं असून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांचा आजचा निकाल, अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. अनिल देशमुख यांनी केलेल्या जामीन अर्जाला सीबीआयनं विरोध केला असला तरी देशमुखांच्या वकिलांनीही कोर्टात सुनावणी दरम्यान युक्तिवाद दरम्यान तपास यंत्रणेकडे कुठला ठोस पुरावा नसल्याचा जोरदार दावा केला आहे.
(शाईफेकीचं समर्थन नाही, मात्र चंद्रकांतदादांना… खडसेंनी पुन्हा डिवचलं)
या प्रकरणातील आरोपी सचिन वाझेनी दिलेला जबाब विश्वासहार्य नाही, अनिल देशमुख यांचा वाढतं वय, त्यांना असलेले आजार, सुनावणी दरम्यान अनेक वेळा ते चक्कर येऊन पडले. हे सर्व लक्षात त्यांना जामीन देण्यात यावा अशीही विनंती कोर्टाला केली आहे.
( खडसे ‘तेव्हाच’ संपले; दूध संघातील विजयानंतर महाजनांचा घणाघात)
ईडीकडे दाखल गुन्ह्यात अनिल देशमुख यांना आधीच जामीन मिळाला आहे. ही जमेची बाजू आणि कोर्टात झालेला जोरदार युक्तिवाद लक्षात घेता, जर या CBI प्रकरणातही जामीन मिळाला तर अनिल देशमुख आज कारागृहातून मुक्त होऊ शकतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.