Anil Deshmukh : तुरुंगातून सुटताच देशमुख सिद्धिविनायकाच्या दर्शनाला…

anil-deshmukh-:-तुरुंगातून-सुटताच-देशमुख-सिद्धिविनायकाच्या-दर्शनाला…

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांची तब्बल वर्षभरानंतर तुरुंगातून सुटका झाली. 

तुरुंगातून सुटका होताच अनिल देशमुख मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेले.

यावेळी देशमुख यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे हे ही उपस्थित होते.

यावेळी देशमुख यांच्यासोबत त्यांची पत्नी आरती देशमुख याही उपस्थित होत्या.

अनिल देशमुख यांनी बाहेर आल्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत आपल्यावर अन्याय झाला असल्याचं म्हणत दु:ख व्यक्त केलं. 

‘मला अतिशय दु:ख आहे की, एका खोट्या गुन्ह्यामध्ये तेही एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमाने केलेल्या आरोपामुळे 14 महिने तुरुंगात राहावं लागलं याचं दु:ख आहे.’ असं देशमुख म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *