Abhijeet Bichukale : सध्या महाराष्ट्राला माझ्याशिवाय पर्याय नाही : अभिजीत बिचुकले

- मुख्यपृष्ठ
- करमणूक  / बॉलीवूड – bollywood news
- Abhijeet Bichukale : “माझ्या पत्नीला महाराष्ट्राची पहिला मुख्यमंत्री करणार”, अभिजीत बिचुकलेचा दावा
Abhijeet Bichukale : माझ्या पत्नीला महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री करणार, असा दावा अभिजीत बिचुकलेने केला आहे.
Abhijeet Bichukale
Abhijeet Bichukale : ‘बिग बॉस’मुळे घराघरांत पोहोचलेला अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. बिग बॉसनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आता पुन्हा एकदा त्याचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. माझ्या पत्नीला महाराष्ट्राची (Maharashtra) पहिली महिला मुख्यमंत्री करणार, असा दावा अभिजीत बिचुकलेने केला आहे.
अभिजीत बिचुकलेला (Abhijeet Bichukale) मुख्यमंत्री किंवा राष्ट्रपती होण्याची इच्छा आहे. अनेकदा त्याने यावर भाष्य केलं आहे. पण आता त्याने राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून पत्नीलाच बनवण्याचा विडा हाती उचलला आहे. त्यामुळे एकीकडे अभिजीत बिचुकलेला ट्रोल केलं जात आहे. तर दुसरीकडे महिलांच्या सन्मानाच्या दृष्टीने विचार करत असल्याबद्दल त्याचं कौतुक होत आहे.
अभिजीत बिचुकले यांच्या लग्नाचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. त्यानिमित्ताने त्याने पत्नीला म्हणजेच अलंकृता बिचुकले यांना एक जाहीर पत्र लिहिलं. या पत्राचं शीर्षक होतं,”महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री”.
अभिजीत बिचुकले यासंदर्भात भाष्य करत म्हणाला,”महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री… हे मी पहिल्यांदाच बोललेलो नाही. माझ्या अर्धांगिनी यांनी 2009 साली उदयनराजे यांच्या विरोधात पहिली लोकसभा निवडणूक लढवली तेव्हादेखील एका पत्रकार परिषदेत मी असं म्हणालो आहे”.
अभिजीत बिचुकले पुढे म्हणाले,”मुख्यमंत्री होणाऱ्या महिलेला भारतीय संस्कृतीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. ती माझ्या पत्नीप्रमाणे संस्कृती जपणारी हवी. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाताना हा मुद्दा मी मांडणार आहे. सध्या महाराष्ट्राला माझ्याशिवाय पर्याय नाही”.
संबंधित बातम्या
Abhijeet Bichukale : ‘पठाण’ मधील शाहरुखची हेअरस्टाईल माझ्यासारखी; अभिजीत बिचुकलेचा दावा
ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात