Aai Kuthe Kay Karte : वीणा अरुंधतीला म्हणाली,

- मुख्यपृष्ठ
- करमणूक  / टेलिव्हिजन
- Aai Kuthe Kay Karte : वीणा अरुंधतीला म्हणाली,”तू तीन मुलांची आई, अनिरुद्धसोबत 25 वर्षांचा संसार…”
Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या आगामी भागात वीणा अरुंधतीला तिच्या लव्हस्टोरीबद्दल विचारताना दिसणार आहे.
Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस यावी साठी निर्माते सतत नव-नवे ट्वीस्ट आणत आहेत. आता या मालिकेच्या आगामी भागात वीणा अरुंधतीला तिच्या लव्हस्टोरीबद्दल विचारताना दिसणार आहे.
प्रोमोमध्ये काय आहे?
‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये वीणा अरुंधतीला तिच्या आणि आशुतोषच्या लव्ह स्टोरीबद्दल विचारताना दिसत आहे. ती म्हणतेय,”तू तीन मुलांची आई आहेस आणि अनिरुद्धसोबत 25-26 वर्षांचा संसारही केलास”. त्यानंतर अरुंधती वीणाचं बोलणं टाळताना दिसत आहे. ती म्हणतेय,”याविषयावर आपण नंतर कधीतरी बोलू”.
वीणा मात्र अरुंधतीचं न ऐकता तिचं बोलणं सुरुचं ठेवते. ती म्हणते,”अनिरुद्ध खूप चांगला आहे. त्यानेच मला आत्मविश्वास दिला की मी हा बिझनेस नक्की पुढे नेऊ शकते”. वीणाच्या बोलण्यावर प्रतिक्रिया न देता अरुंधती तिला झोपी जाण्याचा सल्ला देते.
वीणा ही आशुतोषची सख्खी बहीण नसून ती त्याच्या आत्याची मुलगी आहे. सुलेखाताईंना मात्र वीणा त्यांच्या मुलीसारखीच आहे. आता वीणाच्या येण्याने अरुंधतीच्या आयुष्यावर काय परिणाम होणार, असा प्रश्न मालिकाप्रेमींना पडला आहे.
‘आई कुठे काय करते’ मालिकेत वीणाची एन्ट्री झाल्याने मालिकेत रंजक वळण आलं आहे. वीणाचा वापर करुन अनिरुद्ध आशुतोषच्या आणि अरुंधतीच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करत आहे याचा अंदाज अरुंधतीला आला आहे. त्यामुळे वीणाच्या येण्याने अरुंधतीच्या आयुष्यात काय ट्विस्ट येणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुंधती ही भूमिका मधुराणी प्रभूलकर या साकरतात तर अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळी हे साकारतात. तर संजना ही भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले ही साकारते. आई कुठे काय करते या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे.
संबंधित बातम्या
Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’मालिकेत नवा ट्वीस्ट; वीणा अनिरुद्धला दाखवणार त्याची जागा