&

सावित्रीबाई फुले यांची आज 192 वी जयंती आहे. जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छगन भुजबळ यांना शब्द दिलाय. काय म्हणालेत, पाहा…
नायगाव, सातारा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 192 वी जयंती आहे. जयंती निमित्त सावित्रीबाईंच्या जन्मगावी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत. यावेळी बोलताना त्यांनी ओबीसी समाजाला आश्वस्त केलंय.
पुण्यातील भिडे वड्याबद्दल अनेक बैठका घेतल्या. सगळया अडचणी दूर करुन भव्य स्मारक उभ करणार. दोन महिन्यांत त्याचं भूमिपूजन करायचं आहे, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
राज्यांमध्ये ओबीसी समाजाचं काम करायला आम्ही कुठेही कमी पडणार नाही. हा शब्द मी भुजबळसाहेब तुम्हाला देतो, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत.
ओबीसी समाजासाठी कुठेच पैसे कमी पडू देणार नाही. भुजबळसाहेब आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. फुले दाम्पत्याने केलेली कामं सगळ्यांपर्यंत पोहोचवलं जाईल, असा शब्द देतो, असंही ते म्हणालेत.
महाज्योतीची सगळे कामे करणार आहे.शक्ती कायदा नक्की पारित होईल असा शब्द मी देतो. विधवा महिलांना सुद्धा काहीच कमी पडू देणार नाही हा माझा शब्द आहे. त्याचं पालकत्व शासन नक्की घेईल याचा शब्द मी तुम्हाला देतो, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना आश्वस्त केलं.
भुजबळ साहेब यादी देखील आपण सरकार मध्ये काही कारणामुळे आपण काम करू शकलो नाही. पण आता सगळी कामं केली जातील, असं ते म्हणालेत.
सावित्रीबाई फुले यांची आज 192 वी जयंती आहे. जयंती निमित्त सावित्रीबाईंच्या जन्मगावी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत. नायगाव फुलं रांगोळ्यांनी सजलं. गावातील अनेक घरांवर गुडी उभारली आहे. नायगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकदेखील सजवण्यात आलं आहे. स्मारकाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतनिमित्त त्यांना अभिवादन करतो. महात्मा फुले यांना त्यांनी खंबीरपणे साथ दिली. स्मारकात त्यांच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा घेऊनच आपण राज्य कारभार करत आहोत. मंत्रालयात लावेल्या तैल चित्रामुळे आपल्याला प्रेरणा मिळत राहतील, असं ते म्हणाले आहेत.