40 चोरांचे 25 घोटाळे आमच्याकडे; लवकरच बाहेर काढणार, संजय राऊतांचा गौप्यस्फोट

मुंबई, 28 डिसेंबर : मागच्या दोन आठवड्यांपासून हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने राज्याच्या राजकारणात जोरदार गदारोळ सुरू आहे. दरम्यान या अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यास सुरू केले आहे. अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्र्यावर झालेल्या आरोपांवरून संजय राऊत यांनी टीका केली आहे. अलीबाबा 40 चोरांनी केलेले एक एक घोटाळे आम्ही बाहेर काढू असे राऊत यांनी म्हंटले आहे.
यावेळी राऊत म्हणाले की, एकाच पक्षातील कित्येक मंत्र्यांवर टीका होत आहे. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही सगळी प्रकरणी गंभीर आहेत. काही लोक म्हणत आहेत बॉम्ब कुठे फुटत आहेत. मग हे बॉम्ब फुटत आहेत की मग काय फुटत आहे. हे टोकण आहे अजुन बरेच काही निघणार असल्याचे राऊत यांनी सांगितलं.
हे ही वाचा : फोन टॅपिंग प्रकरणात मोठी अपडेट; न्यायालयाच्या नव्या आदेशाने रश्मी शुक्ला अडचणीत?
संजय राठोड यांच्या जमीनीचे भ्रष्टाचार, अब्दुल सत्तार यांची कनेक्शन गिरी, 36 एकर गायरान जमीन रेवडीसारखी वाटली ही सुरुवात आहे. सत्तारांनी कृषी कर्मचाऱ्यांना पकडून पैसे गोळा करण्याचे काम सुूरू आहे. उदय सामंतांचे प्रकरण याचे एक प्रकरण आहे. उदय सामंताची डिग्री आणि त्यांचे अस्तित्वही भोगस आहेत. हे येणाऱ्या काळात सिद्ध होईल असे राऊत म्हणाले. शिवसेनेच्या आमदारांना विधानसभेत बोलू दिले जात नसल्याचेही राऊत म्हणाले.
आमच्या जवळ त्यांची 25 प्रकरणे पडली आहेत. पण आम्हाला सीमाभागाचा मुद्दा महत्वाचा होता. हा भ्रष्टाचाराचा वेताळ फडणवीसांना सोबत घेऊन फिरणे जड होत चालले आहे. या सगळ्या चोरांच्या प्रकरणे आमच्या हातात आहेत. त्यांनी केलेल्या कृत्याची प्रकरणे आम्ही बाहेर काढू असे राऊत म्हणाले. जयंत पाटलांनी जो शब्द वापरला तो 40 आमदारांसाठी लागू पडतो आहे.
जयंत पाटलांनी जो शब्द वापरला होता निर्लज्ज सरकार, गेंड्याच्या कातडीचा सरकार तुम्ही आमच्यावर भ्रष्टाचाराचे कितीही पुराचा पुरावे दिले तरी आम्ही खुर्चीला चिटकून राहू, नैतिकता नाही प्रामाणिकचा नाही आणि महाराष्ट्रावर्षी प्रेम नाही असे सरकार आहे थोडी जरी नैतिकता असती तर या अधिवेशनामध्ये चार मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री घेतले असते असेही राऊत म्हणाले.
हे ही वाचा : ठरलं! हिवाळी अधिवेशनाचं सूप 30 डिसेंबरलाच वाजणार
कर्नाटक मुद्यावर राऊत म्हणतात
मुंबई पहिला केंद्रशासित करा मग आमच्यावर बोला अशी मागणी कर्नाटकचे मंत्री करत असल्याचा राऊत यांनी प्रश्न विचाताच ते म्हणाले की, आम्ही मुंबईत कानडी लोकांवर अत्याचार करत नाही. मुंबईत देशातील लोक येतात आणि ते इथे गुण्यागोविंदाने राहतात. तसे सीमाभागात होत आहे का? पहिला सीमाभाग केंद्रशासित करा मग मुंबईवर बोला असे राऊत म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.