31st च्या पार्टीत सासऱ्याला दारू पाजली, सासूला घेऊन जावई रफूचक्कर… सासरा पुन्हा बेशुद्ध

31st-च्या-पार्टीत-सासऱ्याला-दारू-पाजली,-सासूला-घेऊन-जावई-रफूचक्कर…-सासरा-पुन्हा-बेशुद्ध

सासूचं जावयावर प्रेम जडलं, सासऱ्याला दारू पाजली आणि सासू जावई पसार झाले, या अनोख्या प्रेमप्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा आहे

Updated: Jan 2, 2023, 10:08 PM IST

Unique Love Story: आतापर्यंत तुम्ही अनेक लव्ह स्टोरीबद्दल (Love Story) ऐकलं असेल. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा लव्हस्टोरीबद्दल सांगणार आहोत, जी वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. ही लव्ह स्टोरी आहे सासू (mother in law) आणि जावयाची (son in law). 40 वर्षांच्या सासूचं आपल्या 27 वर्षांच्या जावयावर प्रेम जडलं. जावयालाही सासू आवडू लागली. पण हे यावरच थांबलं नाही, दोघांनीही एकत्र राहाण्याचा निर्णय घेतला आणि दोघं घरातून पसार झाले. 

जावयाने असा आखला प्लान
जावयी देखली आपल्या सासूच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. सासूला पळवून नेण्यासाठी त्याने एक प्लान आखला. जावयाने सासऱ्यासोबत दारू पार्टी (Liquor Party) केली. दारूच्या अति सेवनामुळे सासरा नशेत बेशुद्ध झाला. पण जेव्हा शुद्धीत आला तेव्हा त्याला आपली पत्नी आणि जावई पळून गेल्याचं कळलं आणि तो पुन्हा बेशुद्ध झाला. पुन्हा शुद्धित आल्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली असून  तक्रारीच्या आधाके पोलीस त्याची पत्नी आणि जावयाचा शोध घेत आहेत.

सासूचा जावयावर जडला जीव
ही घटना राजस्थानमधल्या सिरोही (Sirohi Unique Love Story) इथली आहे. इथल्या सियाकरा गावातील एक महिलेचा आपल्याच जावयावर जीव (Saas love with Damaad) जडला. संधी मिळताच सासू आणि जावयी घरातून पसार झाले. सियाकला गावात राहणाऱ्या रमेश नावाच्या व्यक्तीच्या मुलीचं लग्न नारायण जोगी नावाच्या तरुणाशी झालं. लग्नानंतर मुलगी आणि तिचा पती वरचेवर सासरी येत होते. या दरम्यान सासूला जावई आवडू लागला, या दोघांमध्ये जवळीक वाढू लागली आणि त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं. 

हे ही वाचा : 2022 मध्ये boycott trend चा फटका, 2023 मध्ये काय होणार? या चित्रपटांवर लागलेत बॉलिवूडचे 2500 कोटी रुपये

1st ची पार्टी पडली महागात
31 डिसेंबरला नव्या वर्षाची पार्टी करण्याच्या नावाखाली जावई नारायण जोगी याने आपला सासरा रमेशला भरपूर दारू पाजली. रमेशला या गोष्टीची कल्पना नसल्याने तोही नारायण जोगीच्या बोलण्यात फसला आणि भरपूर दारू पिऊन बसला. याच संधीचा फायदा उचलत नारायण जोगीने सासूला बरोबर घेत घरातून पलायन केलं.

दारूची नशा उतरल्यावर रमेश आपल्या पत्नीला शोधू लागला. पण काही वेळाने त्याला आपली पत्नी जावयाबरोबर पळून गेल्याचं कळलं तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. या धक्क्यातून सावरत त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. ही गोष्ट त्याने आपल्या मुलीलाही कळवली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. रमेश आणि त्याच्या पत्नीला एक मुलगा आणि तीन मुली आहेत. चारही मुलांचं लग्न झालं आहे. 

हे ही वाचा : Ind vs Lanka : हार्दिक, सूर्यकुमारवर जबाबदारी देण्यामागे हे आहे कारण? बीसीसाआयचा मोठा गेम उघड

सासू आणि जावयच्या या अनोख्या लव्ह स्टोरीची सध्या जिल्ह्यात एकच चर्चा आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *