3 हजारात कोणी ऐश्वर्या अथवा दीपिकासारखं नाही दिसू शकतं, ब्युटी पार्लरवाली नववधूवर चिडली!

3-हजारात-कोणी-ऐश्वर्या-अथवा-दीपिकासारखं-नाही-दिसू-शकतं,-ब्युटी-पार्लरवाली-नववधूवर-चिडली!

ब्युटीशियन मोनिका पाठक चिडली, अन् नवरीलाच बरं-वाईट बोलून गेली!

Updated: Dec 9, 2022, 12:52 AM IST

Viral News : मध्य प्रदेशमधून एक घटना समोर आली होती, ज्यामध्ये एका नववधूने मेकअप खराब केला म्हणून थेट पोलिसात तक्रार दाखल केली होती. नववधूने खराब मेकअप केला म्हणून तिला फोन करून सुनावल्यावर ब्युटी पार्लरची संचालिका मोनिका पाठकने तिला जातीवाचक शिवीगाळ केली होती. शिवीगाळ केल्याने नववधून पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली होती. 

ब्युटीशियन मोनिका पाठक यावर बोलताना म्हणाली की, तिच्याकडे अनेक प्रकारचे ग्राहक येतात. जो मोबाईलमध्ये हिरोईनचे फोटो दाखवतो आणि म्हणतात की दीपिका पदुकोण आणि ऐश्वर्या राय सारखा मेकअप हवा आहे पण हा मेकअप तीन हजार रुपयांत शक्य नाही. कारण आमच्याकडे सर्व प्रकारचे मेकअप आहे पण त्या मेकअपसाठी पैसे जास्त लागतात. 

नेमकं काय घडलं? 
ही घटना मध्य प्रदेशमधील असून एका मुलीचा 3 डिसेंबरला विवाह होता. वधूच्या घरच्यांनी वधूच्या मेकअपसाठी मोनिका मेकअप स्टुडिओच्या संचालिका मोनिका पाठक यांच्याशी संपर्क साधला होता. ब्युटी पार्लरच्या संचालिका मोनिका पाठक यांनी साडे तीन हजार रूपये फी सांगितली.

ठरल्याप्रमाणे लग्नाच्या दिवशी म्हणजेच 3 डिसेंबरला स्टुडिओच्या संचालिका मोनिका पाठक यांना फोन केला. वधूला पार्लरमध्ये नेण्यात आलं. त्यावेळी मोनिका तिथे उपस्थित नव्हत्या. पार्लरमधील कर्मचाऱ्यांनी तिचा खराब मेकअप केला. संतापलेल्या वधूने मोनिका पाठक यांना फोन करत झालेला सर्व प्रकार सांगितला. मात्र मोनिकाने वधूला जातीवाचक शिवीगाळ केली होती.

ही माहिती सेन वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना कळताच तेही संतप्त झाले. मंगळवारी वधूसह असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचले आणि मोनिका पाठक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

दरम्यान, स्टेशन प्रभारी अनिल गुप्ता यांनी सांगितले की वधू आणि सेन समुदायाने दिलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली जात आहे. याप्रकरणी लवकरच मोनिका पाठकची चौकशी करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *