18 की 16? कोणत्या वयात Sex करण्याची परवानगी द्यावी, राष्ट्रवादीच्या महिला खासदाराने थेट संसदेत हुज्जत घातली

राष्ट्रवादीच्या महिला खासदाराने थेट संसदेत हा मुद्दा उपस्थित केला. जोडीदारामध्ये संमतीने sex होत असल्यास त्यांचे वय किती 18 की 16 नेमके किती असावे. या प्रकरणावर न्यायालयापासून सुरु झालेली चर्चा आता थेट संसदेपर्यंत पोहचली आहे. संमतीने सेक्स करण्याचे वय कमी होणार का यावरुन वाद सुरु झाला आहे.
Updated: Dec 23, 2022, 07:56 PM IST
Sex Age : केंद्र सरकारकडून महिलांचे लग्नाचे वय निश्चित करण्यावरुन विचार विनीयम सुरु आहे. त्यातच आता तरुण तरुणांनी शारिरीक संबध(Age Of Sex ) अर्थात सेक्स कोणत्या वयात करावा यावरुन देखील मतभेद सुरु झाले आहेत. 18 की 16? कोणत्या वयात तरुणांना Sex करण्याची परवानगी द्यावी यावर वाद सुरु झाला आहे. राष्ट्रवादीच्या महिला खासदाराने थेट संसदेत हा मुद्दा उपस्थित केला. जोडीदारामध्ये संमतीने sex होत असल्यास त्यांचे वय किती 18 की 16 नेमके किती असावे. या प्रकरणावर न्यायालयापासून सुरु झालेली चर्चा आता थेट संसदेपर्यंत पोहचली आहे. संमतीने सेक्स करण्याचे वय कमी होणार का यावरुन वाद सुरु झाला आहे.
गुरुवारी राज्यसभेत राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी या संदर्भातील मुद्दा उपस्थित केला.पॉक्सो कायद्यात सुधारणा करून संमतीचे वय कमी करण्याची मागणी चव्हाण यांनी सरकारकडे केली. न्यायालयांच्या निर्णयाचा दाखल देत त्यांनी हा मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न केला. POCSO कायद्याचा उद्देश अल्पवयीन मुलांचे लैंगिक हिंसाचारापासून संरक्षण करणे आहे.
किशोरवयीन मुलांमध्ये सहमतीपूर्ण प्रेमसंबंध आणि त्यातून होणाऱ्या शारिरीक संबधांना गुन्हेगारी स्वरूप दिले जाते. यामुळे संमतीने होणारे शारिरीक संबधातील वय कमी करण्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यापूर्वी POCSO कायद्यात फाशीची शिक्षा नव्हती. 2019 मध्ये त्यात सुधारणा करून मृत्युदंडाची तरतूद करण्यात आली. या कायद्यानुसार जन्मठेपेची शिक्षा झाली असेल तर दोषींना आजन्म कारावस भोगावा लागतो.
2012 मध्ये पोक्सो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्टची अंमलबजावणी झाली. या कायद्यानुसार 18 वर्षांखालील व्यक्तींना बाल गुन्हेगार समजले जाते. या कायद्यात सेक्ससाठी संमतीचे वय 18 वर्षे आहे. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीने तिच्या स्वत:च्या इच्छेने किंवा संमतीने शारिरीक संबध ठेवले तरी हा गुन्हा ठरतो. अशा प्रकरणांमध्ये 18 वर्षाखालील मुलांना अटक करून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला जातो.
13 नोव्हेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणातील एका तरुणाला जामीन मंजुर केला. या मुलाने 17 वर्षीय मुलीसोबत संमतीने शरीर संबंध ठेवले होते. मात्र, त्याला या प्रकरणात बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मुलांचे लैगिक सोशन रोखण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला आहे. मात्र, किशोरवयीन मुलांमधील सहमतीपूर्ण प्रेमसंबंधांना गुन्हेगार ठरवणे योग्य नाही अशी टिपण्णी कोर्टाने दिली होती.
यापूर्वी 5 नोव्हेंबर रोजी कर्नाटक उच्च न्यायालयानेही वय वाढविण्याचा विचार करण्याचे सुचवले होते. १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलींच्या प्रेमात पडण्याची आणि प्रियकराशी संमतीने संबंध ठेवण्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे अशा परिस्थितीत विधी आयोगाने पुन्हा एकदा लैंगिक संमतीच्या वयाचा विचार करायला हवा अशा सूचना कर्नाटक उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिल्या होत्या.
laTMl1Wm ipI0w4I6 mvb31U43 y6bQwmM2 a2CuPg9M a45oUFpH bmpsTqa6 wgX9d6xo StvOcdnM zBbIHNpm