100 रुपये दिले नाही म्हणून तरुणाचा मनगटापासून कापला हात, पुणे हादरलं

100-रुपये-दिले-नाही-म्हणून-तरुणाचा-मनगटापासून-कापला-हात,-पुणे-हादरलं

पुणे, 02 जानेवारी : पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पाषाण भागात अवघ्या 100 रूपयांसाठी चार जणांनी विद्यार्थ्याचा हात मनगटापासून कापला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी 2 जणांना अटक केली असून 2 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाण भागात ही घटना घडली आहे. या हल्ल्यात पंकज तांबोळी जखमी असून आशुतोष माने (२४) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. प्रणव काशिनाथ वाघमारे (१८) आणि गौरव गौतम मानवतकर (२०) अशी अटक केलेल्यांची नावं आहे.

(लग्नासोबत नोकरीही लावून देईल; आमिषाला बळी पडल्याने विवाहितेसोबत धक्कादायक प्रकार, दोन वर्षांनी गुन्हा दाखल)

फिर्यादी आशुतोष माने हे त्यांचे मित्र अभिजित सानमुटे, साजिद शेख, स्वप्निल पाटील, मिहीर देशपांडे हे पाषाण परिसरात राहायला आहेत. 31 डिसेंबर रोजी मेस बंद असल्यामुळे माने, साजीद शेख, पंकज तांबोळी हे तिघेजण रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास साई चौकात आले. तेथे पंकजचा मित्र मयुर फुंदे हा देखील जेवण करण्यासाठी आला होता. सर्वांनी हर्षदा या हॉटेलमध्ये जेवण केले. दरम्यान, त्या ठिकाणी मोटारसायकलवरून 2 मुले आली आणि त्यांनी मयुर आणि पंकज यांच्याकडे 100 रूपयांची मागणी केली.

(जावयाच्या प्रेमात आकंठ बुडाली; नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत फरार झाली सासू, पण…)

पण पंकजने मात्र पैसे नसल्याचे सांगितले. या मुलांनी आणखी दोन जणांना तिथे बोलवून पंकजला शिवीगाळ केली आणि त्याच्या डाव्या हातावर धारदार हत्याराने वार केले. काही क्षणातच पंकजचा डावा हात मनगटापासून निखळून पडला. या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंकजला रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून इतर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *