100 दिवसांचा रंजक खेळ अखेर संपणार; या दिवशी रंगणार बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले

मुंबई, 29 डिसेंबर : सध्या टेलिव्हिजनवरील एका शोची प्रचंड चर्चा सुरु आहे तो म्हणजे बिग बॉस मराठी. हा शो आता शेवटाकडे आला असला तरी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करत आहे. आता या अंतिम टप्प्यात शो मध्ये स्पर्धकांमध्ये होणारे राडे वाढले असले तरी काही स्पर्धकांमध्ये मैत्रीचे गोड क्षण देखील पाहायला मिळतात. मैत्री आणि भांडण असा प्रवास पाहणाऱ्या या बिग बॉसच्या आता काहीच स्पर्धक उरले आहेत. लवकरच टॉप 5 स्पर्धक समोर येतील. आता अखेर बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्याची घोषणा झाली आहे.
नुकताच कलर्स वाहिनीने बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्याची घोषणा करणारा प्रोमो प्रदर्शित केला आहे. बिग बॉस मराठी 4 ची ग्रँड फिनाले येत्या 8 जानेवारीला होणार आहे. ‘इथे आहेत सगळेच दावेदार, पण Winner मात्र एकचं होणार! पाहा BIGG BOSS मराठी सीझन 4 चा Grand Finale…’ असं म्हणत वहिनीने अखेर ग्रँड फिनालेची घोषणा केली आहे.बिग बॉस मराठीचाग्रँड फिनाले 8 जानेवारी संध्या. 7:00 वा. फक्त कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा – Bhumi Pednekar: ‘माझ्या अंगावर खूप कमी कपडे…’; ‘तो’ इंटिमेट सीन शूट करताना अशी झाली होती भूमीची अवस्था
यासोबतच आज अंतिम फेरीत जाणारे टॉप पाच स्पर्धकांची नावे समोर येणार आहेत. आता बिग बॉसच्या घरात अंतिम टप्प्यात अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, अक्षय केळकर, किरण माने हे पहिल्यापासून घरात असणारे तर राखी सावंत आणि आरोह वेलणकर हे वाईल्ड कार्ड असे सहा स्पर्धक उरले आहे. यांच्यापैकी एकाला आज घराचा निरोप घ्यावा लागणार आहे.
आता बिग बॉसच्या स्पर्धकाला 15 लाखांचं बक्षीस मिळणार आहे. आधी एका टास्क दरम्यान या रकमेची किंमत कमी झाली होती. पण आता अखेर अंतिम रक्कम समोर आली आहे. आता स्पर्धकांमध्ये विजेतेपद पटकवण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच आज एक स्पर्धक घराबाहेर जाणार आहे. तो कोण असेल हे बघणं देखील महत्वाचं आहे.
बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनबाबत प्रेक्षकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन पाहून फेअर आणि अनफेअरवरून सोशल मीडियावर चांगलंच ट्रोलिंग सुरू आहे. त्यातच आता या सीझनचा महाअंतिम सोहळ्यात विजेतेपद कोणता स्पर्धक पटकावणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.