10 वर्षांनी महिलेचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला; पाहताच सरकली पायाखालची जमीन

मुंबई 10 डिसेंबर : एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या धार्मिक श्रद्धेनुसार त्याचे अंतिम संस्कार केले जातात. काही धर्मात मृतदेह जाळला जातो, तर काहींमध्ये मृतदेह जमिनीत दफन केला जातो, तर काही ठिकाणी गिधाडांच्या स्वाधीन केला जातो. ज्या धर्मात मृतदेहाला अग्नि दिली जाते, त्यात शरीराचा प्रत्येक अवयव पूर्णपणे राख होतो, परंतु दफन करण्याच्या बाबतीत बोलायचं झालं, तर यात शरीर इतक्या लवकर नष्ट होत नाही.
शरीराचा प्रत्येक अवयव कुजून नष्ट होण्यासाठी वेगवेगळा वेळ लागतो. Hairlosscure 2020 नावाच्या वेबसाइटनुसार, केस पूर्णपणे नष्ट होण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी लागतो. पण सध्या डॉमिनिकन रिपब्लिकच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. ही घटना एका मृत शरीराच्या केसांशी संबंधित आहे. ज्यात मृत महिलेचे केस 10 वर्षानंतरही नष्ट झाले नाहीत.
हौस म्हणून महिलेनं डोळ्यांमध्ये गोंदवला टॅटू; आता झाली अशी अवस्था की वाचूनच उडेल थरकाप
डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, डोमिनिकन रिपब्लिक देशात 10 वर्षांपूर्वी एक वृद्ध महिला मार्गारीटा रोसारियो यांचे निधन झाले. त्यांना 10 वर्षापूर्वीच कोलोनिया स्मशानभूमीत दफन करण्यात आलं होतं पण नंतर त्यांना दुसऱ्या स्मशानभूमीत हलवावं लागणार होतं. त्यासाठी इतक्या वर्षांनंतर मृतदेह कबरीतून बाहेर काढला गेला. मात्र यावेळी जे काही दृश्य दिसलं, ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसला.
महिलेच्या डोक्यावरचे केस मृत्यूच्या वेळी जसे होते तसेच 10 वर्षांनंतरही होते. एवढंच नाही तर तिच्या शरीरावरील त्वचाही पूर्णपणे नष्ट झालेली नाही. हे काही चमत्कारापेक्षा कमी नव्हतं आणि कुटुंबासह तिथे काम करणार्या अँटोनियो अॅब्रेलाही हे सगळं पाहून आश्चर्यकारक वाटलं. प्राइमर इम्पॅक्टो नावाच्या वेबसाईटशी बोलताना त्यांनी सांगितलं की, ते 13 वर्षांपासून स्मशानभूमीत काम करत आहेत, मात्र त्यांनी असं कधीच पाहिलं नाही. महिलेचा मृतदेह पांढऱ्या रंगाचा नाईट गाऊन घालून नंतर दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आला.
मृत शरिराचं पोस्टमॉर्टम करताना, पोटातून बाहेर आला जिवंत साप आणि…
या घटनेबाबत कुटुंबीयांचं वेगळं मत आहे. ते म्हणतात, की ती महिला खूप दयाळू मनाची व्यक्ती होती आणि ती सर्वांना मदत करत असे. हेच कारण आहे की त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचा मृतदेह 10 वर्षात जितका नष्ट व्हायला हवा होता तितका झाला नाही. या विषयावरील तज्ज्ञांचं म्हणणं आहे की जीवाणूंद्वारे मृत शरीराचे विघटन करण्याची प्रक्रिया काही कारणास्तव खंडित झाली असावी, ज्यामुळे ते पूर्णपणे नष्ट होऊ शकले नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.