Home » राष्ट्रीय » NEET PG 2021: UG पाठोपाठ PG परीक्षेचीही तारीख ठरली; आरोग्यमंत्र्यांची घोषणा

NEET PG 2021: UG पाठोपाठ PG परीक्षेचीही तारीख ठरली; आरोग्यमंत्र्यांची घोषणा

neet-pg-2021:-ug-पाठोपाठ-pg-परीक्षेचीही-तारीख-ठरली;-आरोग्यमंत्र्यांची-घोषणा

आता NEET पोस्ट ग्रॅज्युएशन परीक्षेच्या तारखेचीही घोषणा करण्यात आली आहे.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 13, 2021 06:34 PM IST

नवी दिल्ली, 13 जुलै: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Minister Dharmendra Pradhan) यांनी काल NEET च्या UG परीक्षेची तारीख (NEET UG Exam date 2021) जाहीर केली. त्यानंतर आजपासून या परीक्षेच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे. त्या पाठोपाठ आता आता NEET पोस्ट ग्रॅज्युएशन (NEET PG Exam date 2021) परीक्षेच्या तारखेचीही घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मंडाविया (Minister Mansukh Mandaviya) यांनी ट्विट करून परीक्षेच्या तारखेची घोषणा केली आहे.

हे वाचा – NEET UG 2021: परीक्षेसाठी आजपासून सुरु झालं रजिस्ट्रेशन; असा भरा ऑनलाईन फॉर्म

डॉक्टर होण्याची स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांना NEET ही परीक्षा देणं गरजेचं असतं.  तर MBBS केल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश (Medical Post Graduation Admission) हवा असेल तर NEET PG हे प्रवेश परीक्षा येण्याची गरज असते. NEET PG हे परीक्षा आता 11 सप्टेंबर 2021 ला घेण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.

We have decided to conduct #NEET Postgraduate exam on 11th September, 2021.

My best wishes to young medical aspirants!

— Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) July 13, 2021

NEET UG  परीक्षेप्रमाणेच या परीक्षेसाठीही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कोरोनाच्या नियमांचं पालन करण्यासोबतच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना मास्कचं वाटप करण्यात येणार आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या येण्याच्या आणि जाण्याच्या वेळेचे स्लॉट्स निश्चित करण्यात येणार आहेत. तसंच सर्व प्रकारचं रजिस्ट्रेशन हे शारीरिक संपर्क न होता असणार आहे. सोशल डिस्टंसिंगबाबतही संपूर्ण खबरदारी घेण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Published by: Atharva Mahankal

First published: July 13, 2021, 6:32 PM IST

Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *