Home » Uncategorized » निर्घृण बदला! दलित नेत्याच्या हत्येतील आरोपी महिलेचा खून, शीर कापून ठेवलं फोटोवर

निर्घृण बदला! दलित नेत्याच्या हत्येतील आरोपी महिलेचा खून, शीर कापून ठेवलं फोटोवर

निर्घृण-बदला!-दलित-नेत्याच्या-हत्येतील-आरोपी-महिलेचा-खून,-शीर-कापून-ठेवलं-फोटोवर

दलित नेते सी. पशुपती पांडियन यांच्या हत्येचा आरोप (Murder of a woman accused in leader Pandian murder case) असणाऱ्या एका महिलेचा निर्घृण खून झाला आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  चेन्नई, 23 सप्टेंबर : दलित नेते सी. पशुपती पांडियन यांच्या हत्येचा आरोप (Murder of a woman accused in leader Pandian murder case) असणाऱ्या एका महिलेचा निर्घृण खून झाला आहे. तमिळनाडूतील डिंडीगुलमध्ये (Nimlala devi’s throat was slit in Dindigul) निर्मला देवी या 70 वर्षांच्या महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली.  पांडियन यांच्या खुन्यांना आपल्या घरात आसरा दिल्याचा आरोप तिच्यावर होता. पांडियन यांच्या खुनाना आरोप असणाऱ्या इतर आरोपींचीदेखील यापूर्वी हत्या झाली आहे. त्यामुळे पांडियन यांच्या समर्थकांनीच ही हत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. असा केला खून बुधवारी निर्मलादेवी ही मनरेगा साईटवर काम करण्यासाठी पायी चालली होती. त्यावेळी दोन आरोपींनी तिला पकडले आणि तिच्यावर चाकूने वार करायला सुरुवात केली. ती मरण पावल्यानंतर चाकूनं तिचे शीर आणि धड वेगळं करण्यात आलं. तिचं शीर घेऊन आरोपी तिथून निघून गेले आणि ज्या ठिकाणी पांडियन यांची हत्या झाली होती, तिथं पोहोचले. ननथावनपट्टी नावाच्या गावात पांडियन यांच्या घराच्या परिसरात त्यांच्या पोस्टरखाली त्यांनी महिलेचं शीर ठेवलं आणि तिथून पोबारा केला. यापूर्वी 4 हत्या यापूर्वी पांडियन यांच्या हत्येचा आरोप असणाऱ्या 4 आरोपींची हत्या झाली आहे. त्यामुळे पांडियन समर्थकांकडून या हत्या होत असल्याचा पोलिसांना संशय आहे. आतापर्यंत पारा मडासामी, मुथुपंडी, बच्चा उर्फ मडामासी आणि सामी उर्फ अरुमुगामासी यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. पांडियन यांची हत्या 10 जानेवारी 2012 रोजी झाली होती. हे वाचा – ‘2022 पर्यंत भारतात तयार होणार 100 कोटी कोरोना लसींचे डोस’ टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या बातमीनुसार 18 जणांवर पांडियन यांच्या खूनाप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. डिंडीगुडच्या स्पेशल कोर्टात पांडियन यांच्या हत्येचा खटला सुरू आहे. पोलिसांनी निर्मला देवी यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला देह ताब्यात घेतला असून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. दरम्यान, खूनी ज्या बाईकवरून आले होते, ती बाईक पोलिसांना सापडली असून त्याआधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

  Published by:desk news

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *

  You may have missed