Home » मुंबई » Maharashtra SSC Result 2021: एका SMS वर मिळवा दहावीचा निकाल

Maharashtra SSC Result 2021: एका SMS वर मिळवा दहावीचा निकाल

maharashtra-ssc-result-2021:-एका-sms-वर-मिळवा-दहावीचा-निकाल

Maharashtra SSC Result on mobile via SMS: दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येत आहे. हा निकाल तुम्ही मोबाइलवर सुद्धा पाहू शकता.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 16, 2021 01:04 PM IST

मुंबई, 16 जुलै : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education MSBSHSE) कडून आज दहावीचा निकाल (SSC Result) आज जाहीर होत आहे. दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे आणि त्यासोबतच मोबाइलवर एसएमएसच्या (SSC result on SMS) माध्यमातून सुद्धा पाहू शकतात. जाणून घेऊयात कशा प्रकारे विद्यार्थी निकाल पाहू शकतात.

मोबाइलवर निकाल कसा पहायचा? (SSC Result 2021 on Mobile via SMS)

विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाइल फोनवरुन एक एसएमएस करायचा आहे आणि त्या नंतर लगेचच त्यांना मोबाइलवर निकाल पहायला मिळेल. यासाठी विद्यार्थ्यांनी MHSSC टाईप करुन स्पेस द्यायचा आणि मग आपला Seat Number टाईप करायचा. मग हा एसएमएस 57766 या क्रमांकावर पाठवायचा आहे. तुम्ही हा एसएमएस पाठवताच अवघ्या काही क्षणात विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पहायला मिळेल.

वेबसाईटवर दहावीचा निकाल

http://result.mh-ssc.ac.in या सकेतस्थळावर उपलब्ध होतील व या माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल.

मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ http://result.mh-ssc.ac.in असे आहे.

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळाना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

Maharashtra SSC result 2021 Live Updates: आज दुपारी एक वाजता 10 वी निकाल होणार जाहीर, या वेबसाईटवरुन घेता येईल निकालाची प्रिंट आऊट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन 2021 मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता10 वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

सन 2021 च्या इयत्ता दहावीत एकूण मुले – 9 लाख 9 हजार 931 प्रविष्ट होते, तर मुली – 7 लाख 78 हजार 693 असे एकूण – 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी प्रविष्ट होते. एकूण आठ माध्यमानुसार विद्यार्थी प्रविष्ट आहेत. राज्य मंडळ स्तरावर 3 जुलै 2021 ते 15 जुलै 2021 अखेर या दरम्यान मंडळामार्फत निकाल तयार करण्याची कार्यवाही करण्यात आली.

Published by: Sunil Desale

First published: July 16, 2021, 11:32 AM IST

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *