‘चंद्रकांतदादा हिमालयात कधी जाताय?’; कोल्हापुरातील पराभवानंतर सेनेचं वर्मावर बोट

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. त्यात काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापुरात आमदार निवडून आणण्याच्या भाजपच्या स्वप्नावर विरजण पडलं आहे.
या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधवांनी भाजपच्या सत्यजीत कदम यांना आस्मान दाखवलं आहे. या निकालानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. जयश्री जाधव या जिंकल्या आहेत चांगली गोष्ट आहे. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे सत्यजीत कदम जिंकतील असा विश्वास वाटत होता. जयश्री जाधव जिंकल्या आहेत मी त्यांचं अभिनंदन करतो असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.