नालासोपाऱ्यात तरूणाला बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

मुलीच्या वादातून तरूणाला ८ ते १० जणांनी केली मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
नालासोपाऱ्यात मुलीच्या वादातून एका तरुणाला ८ ते १० जणांच्या जमावाने मारहाण केल्याची घटना घडली आहे या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. नालासोपारा पूर्वेच्या प्रगती नगर परिसरात ही घटना घडली असून मारहाण करतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
सोनू पटेल असं मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो राहत असलेल्या परिसरातील एका मुलीशी त्याचे प्रेमसंबंध होते मात्र मुलीच्या कुटुंबियांना ते पसंत नव्हते त्यामुळे या वादातून मुलीच्या भावाने व त्याच्या इतर साथीदारांनी मिळून त्याला ठोशा बुक्क्यांनी आणि लाकडी फळीने जबर मारहाण केली.. तुळींज पोलीस ठाण्यात याप्रकरणी ८ ते १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे