Home » Uncategorized » Ind vs NZ Test : पदार्पणातच मुंबईकर श्रेयसची शतकी खेळी

Ind vs NZ Test : पदार्पणातच मुंबईकर श्रेयसची शतकी खेळी

ind-vs-nz-test-:-पदार्पणातच-मुंबईकर-श्रेयसची-शतकी-खेळी

भारताचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरने पहिल्याच दिवशी सुनील गावस्करांचा विक्रम मोडल्यानंतर श्रेयसने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवलं.

न्युझीलंडविरुद्ध होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पहिल्याच दिवशी भारताची 4 बाद 145 अशी अवस्था झाली होती. अशा वेळी श्रेयसने जबाबदार खेळीचं दर्शन घडवलं. श्रेयस अय्यरने जडेजासह शतकी भागिदारी करत संघाला चांगल्या स्थितीत नेले.

पहिल्या दिवशी श्रेयसने नाबाद 75 धावा केल्या होत्या. त्यामुळे पदार्पणातच तो शतक करेल असं म्हटलं जात होतं. हा अंदाज श्रेयसने खरा ठरवला. दुसऱ्या दिवसाच्या डावाला सुरूवात झाल्यानंतर पुढील 25 धावा करण्यास त्याने फार वेळ घेतला नाही. जडेजा परतल्यानंतर श्रेयसने शतक खेळी पूर्ण केली. त्याने 157 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 100 धावा केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *