Home » Uncategorized » परमबीर सिंग यांची सात तास चौकशी, सगळे आरोप सिंग यांनी फेटाळले

परमबीर सिंग यांची सात तास चौकशी, सगळे आरोप सिंग यांनी फेटाळले

परमबीर-सिंग-यांची-सात-तास-चौकशी,-सगळे-आरोप-सिंग-यांनी-फेटाळले

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह.India Today

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची सात तास चौकशी करण्यात आली. क्राइम ब्रांच अर्थात गुन्हे शाखेने ही चौकशी केली. आज २३१ दिवसांनी परमबीर सिंग क्राईम ब्रांच समोर हजर झाले. त्यामुळे त्यांची चौकशी सात तास चालली. या चौकशीत परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर झालेले सगळे आरोप फेटाळले आहेत. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार मी तपासात सहकार्य करण्यासाठी आलो आहे. माझ्यावर जे आरोप करण्यात आले आहेत बिनबुडाचे आहेत असं परमबीर सिंग यांनी म्हटलं आहे.

परमबीर सिंग हे आज सर्वात आधी मुंबई विमानतळ या ठिकाणी हजर झाले. तिथे मुंबई तकचे प्रतिनिधी दिव्येश सिंह यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी मी तपासात सहकार्य करण्यासाठी मुंबईत आलो आहे मी सगळं सहकार्य करणार आहे असं परमबीर यांनी सांगितलं होतं. त्यानंतर ते कांदिवली येथील गुन्हे शाखा युनिट अकराच्या कक्षात चौकशीसाठी दाखल झाले. तिथे मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनीही त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी मी तपासात सर्वतोपरी सहकार्य करण्यास आलो असून मला न्याय मिळेल अशी आशा मला आहे असं परमबीर यांनी म्हटलं होतं. यानंतर ते चौकशीसाठी गेले. तिथे सात तास त्यांची चौकशी झाली.

परमबीर सिंग चंदीगढमध्ये आहेत ही माहिती बुधवारी इंडिया टुडेलाच सर्वात आधी मिळाली होती. आपण देशातच असून आपल्या जीवाला धोका आहे असं सांगत सुप्रीम कोर्टाने अटकेपासून संरक्षण दिल्यास आपण चौकशीसाठी हजर राहू असं परमबीर सिंग यांनी म्हटलं होतं. त्यानुसार ते चौकशीसाठी हजर राहिले होते. आता त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावलं जाईल असं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळतं आहे. परमबीर सिंग यांच्या विरोधात मुंबई, ठाणे या ठिकाणी सहा गुन्हे दाखल आहेत. आपल्या विरोधात मुंबईत सुरू असलेल्या सीबीआय चौकशीला सामोरं जाण्याची आपली तयारी आहे असंही परमबीर सिंग यांनी म्हटलं आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह.

परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला मुंबईतल्या बार आणि रेस्तराँमधून 100 कोटी रूपये दर महिन्याला वसूल करण्याचं टार्गेट दिलं होतं. तसंच अनिल देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्या यामध्येही ढवळाढवळ करत होते असाही आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. अँटेलिया प्रकरण समोर आल्यानंतर आणि त्यातला सचिन वाझेचा सहभाग आणि इतर सगळ्या गोष्टी विरोधी पक्षाने समोर आणल्या. ज्यानंतर त्यावेळी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी केली आणि त्यांना डी.जी. होमगार्ड हे पद दिलं.

यानंतर 20 मार्चला परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आणि त्यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट हा त्यातला मुख्य आरोप होता. हे प्रकरण जेव्हा बॉम्बे हायकोर्टात गेलं तेव्हा कोर्टाने या प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपद सोडलं. त्यानंतर विविध घडामोडी घडल्या. आयटी, ईडी आणि सीबीआय यांचे छापे अनिल देशमुख यांच्या घरी, कार्यालयांवर पडत होते. दुसरीकडे चांदिवाल कमिशनकडून या प्रकरणी परमबीर सिंग यांनीही चौकशीसाठी हजर रहावं हे सांगितलं गेलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published.