Home » Uncategorized » ‘तुरुंगात आर्यन ढसाढसा रडायचा, जेवण आवडत नसल्याने फक्त पार्ले बिस्किट खायचा..’

‘तुरुंगात आर्यन ढसाढसा रडायचा, जेवण आवडत नसल्याने फक्त पार्ले बिस्किट खायचा..’

‘तुरुंगात-आर्यन-ढसाढसा-रडायचा,-जेवण-आवडत-नसल्याने-फक्त-पार्ले-बिस्किट-खायचा.’

आर्यन खानला बेल मिळणार की नाही या प्रश्नाचं उत्तर आज मिळणार आहे. मात्र तुरुंगात त्याची काय अवस्था झाली ते समोर आलं आहे. आर्यन खानसोबत त्याच्या बराकीत राहणाऱ्या श्रवण नडार या कैद्याने याबाबत आता माहिती दिली आहे. आर्यन खान तुरुंगात ढसाढसा रडत असे असं श्रवणने सांगितलं. एवढंच नाही तर आर्यनला तुरुंगात आणण्यात आलं तेव्हा त्याचे केसही कापण्यात आले. आर्यनला तुरुंगातील जेवण आवडत नसल्याने तो सुरूवातीला फक्त पार्ले बिस्किट खाऊन त्यावरच गुजराण करत असे. आर्यन खानला कोणतीही व्हीआयपी ट्रिटमेंट तुरुंगात मिळालेली नाही. तो कायमच हे सांगत असतो की तो निर्दोष आहे.

आणखी काय सांगितलं आहे श्रवणने?

श्रवणने सांगितलं की पहिल्या दिवशी आर्यनने तुरुंगातला चहा घेतला. तो चहा त्याला मीच दिला होता. त्यादिवशी त्याने काहीही खाल्लं नाही. कँटिनमधून तो बिस्किटं, चिप्स मागवतो. बिस्किटं पाण्यात बुडवून खातो. नेहमी पॅक केलेलं म्हणजेच बाटलीबंदच पाणी आर्यन घेतो. तुरुंगातल्या नियमांप्रमाणे आर्यनला त्याचं अन्न रोज घ्यावं लागतं. आपल्या वाट्याचं अन्न तो इतर कैद्यांना देतो. एकदा त्याला मी याबाबत विचारलं होतं त्यावेळी त्याने भूक नाही, इच्छा नाही असं उत्तर दिलं. तो एकटाच असतो, कुणाशीही फार बोलत नाही.

आर्यनला अटक केल्यानंतर त्याला आणि त्याच्यासोबत अटक करण्यात आलेल्या सगळ्यांना एक आठवड्यासाठी क्वारंटाईन करण्यात आलं होतं. यानंतर आर्यनला बरॅक नंबर एकमध्ये आणण्यात आलं. एका बरॅकमध्ये १०० कैदी असतात. चार बराकीत चारशे कैदी आहेत. सगळेजण शेजारी-शेजारीच झोपतात. हालचाल करायलाही त्रास होतो. एका बराकीत चार स्वच्छतागृहे आहेत. त्यापैकी एक पाश्चिमात्य पद्धतीचं आणि तीन भारतीय प्रकाराची आहेत. आर्यनच्या कोठडीत १०० कैदी आणि चार पंखे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *