Home » Uncategorized » विश्लेषण : लंडन ते दुबईपर्यंत सेमिनार, ऑक्सफर्डमधून पीएचडी; एफबीआयच्या रडारावर असलेली ‘क्रिप्टो क्वीन’ कोण आहे?

विश्लेषण : लंडन ते दुबईपर्यंत सेमिनार, ऑक्सफर्डमधून पीएचडी; एफबीआयच्या रडारावर असलेली ‘क्रिप्टो क्वीन’ कोण आहे?

विश्लेषण-:-लंडन-ते-दुबईपर्यंत-सेमिनार,-ऑक्सफर्डमधून-पीएचडी;-एफबीआयच्या-रडारावर-असलेली-‘क्रिप्टो-क्वीन’-कोण-आहे?

२०१७ मध्ये जेव्हा जगभरातील तपास यंत्रणांनी तिच शोध सुरू केला तेव्हा ‘क्रिप्टोक्वीन’ हवेत गायब झाली

क्रिप्टो क्वीन या नावाने प्रसिद्ध असलेल्या रुजा इग्नाटोवा हिला अमेरिकेची तपास संस्था एफबीआयने टॉप मोस्ट वॉन्टेड यादीत समाविष्ट केले आहे. रुजा इग्नाटोवावर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. एफबीआयने ३० जून रोजी इग्नाटोवाला टॉप मोस्ट वॉन्टेडच्या यादीत समाविष्ट केले आहे.

बल्गेरियामध्ये जन्मलेल्या ४२ वर्षीय रुजा इग्नाटोवावर, २०१४ मध्ये स्थापन केलेल्या वनकॉईन क्रिप्टोकरन्सी कंपनीद्वारे ४ अब्ज डॉलरहून अधिकची फसवणूक केल्याचा आरोप एफबीआयने केला आहे. रुजा इग्नाटोवा ही मूळची बल्गेरियाची असून ती व्यवसायाने डॉक्टर आहे. रुजाने दावा केला होता की एका वेळी वनकॉईन ही जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बनेल आणि लोक त्यातून अनेक पटींनी नफा कमावतील.

रुजा इग्नाटोवाविरुद्ध फसवणुकीसह आठ गुन्हे दाखल आहेत. क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यासाठी प्रलोभन देण्यासाठी एजंटना कमिशन दिले होते असा आरोप असा आरोप आहे की रुजा इग्नाटोवाच्या कंपनीवर आहे. रुजा २०१७ पासून फरार आहे. रुजा इग्नाटोवाने बल्गेरियाहून ग्रीसला जाणारे विमान पकडले होते. तेव्हापासून तिच्याबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही.

एफबीआयने रुजा इग्नाटोवाबद्दल माहिती देणाऱ्याला १००,००० डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. एफबीआयने रुसा इग्नाटोव्हाला टॉप मोस्ट वाँटेडच्या यादीत समाविष्ट केले आहे. एफबीआयला विश्वास आहे की या यादीत नाव समाविष्ट करून, सामान्य लोक देखील रुजा इग्नाटोव्हाला अटक करण्यात मदत करू शकतात.

रुजा इग्नाटोवावर ‘वनकॉइन’ क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून लोकांची कमाई लुटल्याचा आरोप आहे. रुजाने ऑक्सफर्ड विद्यापीठातून पीएचडी घेतली आहे. लोकांची फसवणूक करण्यासाठी तिले आपल्या बुद्धीचा वापर केला. फोर्ब्सच्या अहवालानुसार, ७२ वर्षांच्या इतिहासात एफबीआयच्या दहा मोस्ट वॉन्टेड आरोपींच्या यादीतील रुजा अकरावी महिला आहे.

लंडन ते दुबईपर्यंत सेमिनार

हा घोटाळा २०१६ मध्ये सुरू झाला. त्यानंतर रुजा इग्नाटोव्हाने वनकॉइनवर लंडन ते दुबईपर्यंत अनेक देशांमध्ये सेमिनार आयोजित केले. प्रत्येक सेमिनारमध्ये ती म्हणायची की एक दिवस वनकॉइन बिटकॉइनला मागे टाकेल. वनकॉइनमधील गुंतवणूक जगभरातील अनेक देशांमधून आली. लोकांनी फक्त रुजाच्या शब्दात येऊन गुंतवणूक केली, अन्यथा वनकॉइनकडे ब्लॉकचेन तंत्रज्ञान नव्हते ज्यावर बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सी काम करतात. रुजाने वनकॉइनला ब्लॉकचेनशी जोडण्याचा प्रयत्न केला, पण ती अयशस्वी झाली.

२०१७ मध्ये जेव्हा जगभरातील तपास यंत्रणांनी तिचा शोध सुरू केला तेव्हा ‘क्रिप्टो क्वीन’ हवेत गायब झाली. इग्नाटोवावर संशय घेऊन ती काय करते हे जाणून घेण्यासाठी तिच्या प्रियकराने घरात बग लावले होते. जेव्हा तिला समजले की वनकॉईनचा तपास एफबीआय करत आहे, तेव्हा ती लगेच बल्गेरियाहून ग्रीसला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये चढली आणि तेव्हापासून ती दिसली नाही.

ती इंग्रजी, जर्मन आणि बल्गेरियन भाषा बोलू शकते आणि ती कदाचित बनावट पासपोर्ट वापरत असावी. न्यूयॉर्क पोस्टच्या मते, तिचे डोळे तपकिरी आणि काळे केस आहेत. मात्र तपासकर्त्यांचा असा दावा आहे की तिने आता तिचे रुप बदलले असावे. इग्नाटोव्हावर अमेरिकेच्या सरकारने वायर फ्रॉड, मनी लॉन्ड्रिंग करण्याचा कट आणि सिक्युरिटीज फसवणूक करण्याचा कट रचल्याचा आरोप लावला आहे.

Web Title: Explained fbi included cryptocurrency fraudster ruja ignatova in list of top most wanted abn

Leave a Reply

Your email address will not be published.