Home » Uncategorized » सुधारणार नाही, तालिबान पुन्हा आणणार हात-पाय कापण्याची शिक्षा

सुधारणार नाही, तालिबान पुन्हा आणणार हात-पाय कापण्याची शिक्षा

सुधारणार-नाही,-तालिबान-पुन्हा-आणणार-हात-पाय-कापण्याची-शिक्षा

तालिबाननं एक निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  काबूल, 25 सप्टेंबर: संपूर्ण जग तालिबानमध्ये (Taliban) काही रिफॉर्म (सुधारणा) होण्याची वाट पाहत आहे. तर त्याचवेळी तालिबाननं एक निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. या निर्णयानुसार अफगाणिस्तानात पुन्हा एकदा अफगाणिस्तानात (Afghanistan) फाशीची शिक्षा आणि ‘गुन्हेगारांचे हात -पाय कापण्याचा युग पुन्हा सुरू होणार आहे. तालिबानच्या या निर्णयामुळे सर्वांनाच झटका बसला आहे. तालिबानचे संस्थापक मुल्ला नूरुद्दीन तुराबी (Mullah Nooruddin Turabi) यांनी असोसिएटेड प्रेसला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं आहे की, अफगाणिस्तानमध्ये फाशी (Executions) देण्याच्या आणि शरीरातील अवयव (Amputations) कापण्याची शिक्षा पुन्हा लागू केली जाईल. मुल्ला नूरुद्दीन म्हणाले की, स्टेडियममध्ये शिक्षा देण्याच्या आमच्या निर्णयावर सर्वांनी टीका केली, पण आम्ही त्यांचे कायदे आणि शिक्षेबद्दल काहीही बोललो नाही. आमचे कायदे कसे असावेत हे जगाने आम्हाला सांगू नये, आम्ही इस्लामचे पालन करू आणि आमचे कायदे कुराणच्या आधारे बनवू, असंही ते म्हणालेत. ठरलं! असं असेल पंजाबचं नवं मंत्रिमंडळ, ‘या’ नेत्यांना डच्चू सुरक्षेसाठी हात कापणे गरजेचे तालिबान नेते म्हणाले की, सुरक्षेसाठी हात कापण्यासारखी शिक्षा अत्यंत आवश्यक आहे. या शिक्षांमुळे गुन्हेगारी कमी करण्यासाठी परिणाम होतो. मुल्ला नूरुद्दीन म्हणाले की, तालिबानचे मंत्रिमंडळ अजूनही ही शिक्षा जाहीरपणे द्यावी की नाही यावर विचार करत आहे. तालिबान याबाबत धोरण तयार करणार आहे. 60 च्या दशकाच्या उत्तरार्धात असलेला मुल्ला नूरुद्दीन तुराबी हा मागील तालिबान सरकारमध्ये मंत्री होते. धर्माशी संबंधित धोरणं राबवणं ही त्यांची जबाबदारी होती. IPL 2021, RCB vs CSK : मॅच हरल्यानंतर विराटनं धोनीजवळ जाऊन केलं असं काही…VIDEO VIRAL जेव्हा तालिबान याआधी सत्तेवर आलं, तेव्हा ते काबुलच्या स्टेडियम, भरचौकात लोकांना सार्वजनिकपणे शिक्षा करायचे. महिलांवर दगडफेक करणं, भर रस्त्यात गोळीबार करणे, हात-पाय कापणे या तालिबानच्या शिक्षेच्या पद्धती होत्या.

  Published by:Maharashtra Maza News

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *

  You may have missed