Home » Uncategorized » फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत 'त्या' मुद्याबद्दल अखेर अजित पवार बोलले

फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत 'त्या' मुद्याबद्दल अखेर अजित पवार बोलले

फडणवीसांसोबत-झालेल्या-बैठकीत-'त्या'-मुद्याबद्दल-अखेर-अजित-पवार-बोलले

‘फडणवीस हे 100 अजित पवार खिशात घालतील, या चंद्रकांत दादांच्या विधानावर मला काहीही बोलायचं नाही मी फक्त विकासावर बोलेन’

‘फडणवीस हे 100 अजित पवार खिशात घालतील, या चंद्रकांत दादांच्या विधानावर मला काहीही बोलायचं नाही मी फक्त विकासावर बोलेन’

  • Maharashtra Maza News
  • Last Updated :

पुणे, 24 सप्टेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery), उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra ) यांच्यात काल महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमुळे राजकीय वर्तुळामध्ये तर्कवितर्क लढवले जात होते. यात प्रामुख्याने 12 आमदारांच्या बाबतीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. पण, आज अजित पवार यांनी हे वृत्त फेटाळून लावले. पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी अनेक मुद्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. फडणवीस यांच्यासोबत आम्ही बैठक पार पडली. पण देवेंद्र फडणवीस यांनी कालच स्पष्ट केले आहे, आम्ही 12 आमदारांबद्दल कोणतीही वाटाघाटी करणार नाही, असं त्यांनीच सांगितलं, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. ‘इमपीरिकल डेटा संदर्भात मी, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांची काल बैठक झाली यावर काही मार्ग निघू शकतो का यावर चर्चा झाली आयोगाकडून अभ्यासपूर्ण माहिती मिळाली तर मार्ग निघू शकतो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत आयोगाला पत्र लिहिणार आहेत’ अशी माहितीही अजित पवारांनी दिली. तसंच, ‘फडणवीस हे 100 अजित पवार खिशात घालतील, या चंद्रकांत दादांच्या विधानावर मला काहीही बोलायचं नाही मी फक्त विकासावर बोलेन आणि तुम्ही माध्यमं तरी कशाला अशा वादग्रस्त विधानांना विनाकारण प्रसिद्धी देऊ नका, अशी माझी विनंती आहे’ मला कुठल्याही वादात रस नाही फक्त विकासाचं विचारा, असं म्हणत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर बोलण्याचे टाळलं. भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, अजितदादा म्हणाले की, ‘मला वादावर विचारू नका मी फक्त विकासावर भर देतो’ असं म्हणत सोमय्यांच्या नाट्यावर बोलण्याचं टाळलं. ‘डीपीडीसी निधीवरून सेना आमदार सुहास कांदे यांची काही तक्रार असेल मी नक्की ती सोडवण्याचा प्रयत्न करेन, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. निवडणूक आयोग त्यांचं काम करत आहे. आम्ही अध्यादेश काढला, राज्यपालांनी त्यावर स्वाक्षरी केली, आता निवडणूक आयोगाचा निर्णय आहे काय करायचं ते, याबद्दल ते लवकरच निर्णय जाहीर करतील, असंही अजित पवारांनी सांगितलं. ‘आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये हॉल तिकीट देण्यात आले आहे. पण त्यामध्ये अनेकांच्या नावात घोळ झाला आहे. या घोळाबाबत राजेश टोपे यांच्याशी बोललोय. मुलांची गैरसोय होणार नाही याची काळजी सरकार नक्की घेईल, असं आश्वासनही अजित पवार यांनी दिलं.

Published by:sachin Salve

First published:

1 thought on “फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत 'त्या' मुद्याबद्दल अखेर अजित पवार बोलले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *